मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचा उल्लेख भाजपचा पदाधिकारी जितेन गजारीया यांनी बिहारच्या तत्कालीन मुख्यमंत्री राबडी देवी यांच्याशी तुलना करणारी पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल केली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला, या प्रकरणाची पोलिसांनी गांभिर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी ही पोस्ट व्हायरल करणारा गजारीया याला ताब्यात घेतले आहे.
गजारिया भाजपचे सोशल मीडिया प्रभारी
जितेन गजारीया याला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ताब्यात घेतले आहे. जितेन गजारीया याने रश्मी ठाकरे यांच्या सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलही ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्ये केले होते. जितेन गजारिया हे भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्विट करताना आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला होता. आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी जितेन गजारिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबतही आक्षेपार्ह लिखान केले होते. त्यामुळे त्यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने नोटीस बजावली होती.
(हेही वाचा मुंबईची लाईफलाईन पुन्हा बंद? काय म्हणाले राजेश टोपे)
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी
त्यानंतर आता जितेन गजारिया यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हे आक्षेपार्ह ट्विट त्यांनी का केले आणि त्यामागे त्यांचा काय उद्देश होता याबाबत आता पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया प्रभारींनी अशाप्रकारे आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाला राज्यात सत्ता मिळत नसल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य सुरू असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येत आहे.
Join Our WhatsApp Community