इतरांना हीन लेखून त्यांना गुलामाप्रमाणे वागवण्याची काँग्रेसची (Congress) नेहमीचीच मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे. स्वतः चे पाय ओबीसी समाजाच्या आमच्या बांधावकडून धुवून घेणारे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) स्वतः ला काय कोणते महाराज,संत,महंत समजतात काय? हा प्रश्न आज जनतेच्या मनात आहे. काँग्रेसच्या (Congress) आणि नाना पटोलेंच्या (Nana Patole) अश्या सरंजामशाही मानसिकतेच्या विरोधात भाजपा (BJP) युवा आणि महिला मोर्चा आज राज्यभर उग्र आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील (Vikrant Patil) यांनी दिली आहे.
(हेही वाचा- स्वारगेट ते मंत्रालय Shivneri Bus मंगळवारपासून अटल सेतूमार्गे धावणार, काय आहेत नियम? जाणून घ्या…)
अकोल्यामध्ये गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पायाला चिखल लागल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कार्यकर्त्याकडून आपली पाय धुवून घेतले त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वतीने राज्यभर युवा मोर्चा “चिखल लगाव आंदोलन” करणार आहे.
नागपुरात युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे निवासस्थान बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. (Nana Patole)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community