…तर मंदिरांची कुलुपे तोडून देवाला भेटू! चंद्रकांत पाटलांचा इशारा

114
ठाकरे सरकार सोबतच्या दोन घटक पक्षांना खूश करण्यासाठी मंदिरे उघडत नाही. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणून मंदिरे बंद करणाऱ्या सरकारला संध्याकाळपर्यंत अल्टिमेटम देत आहोत, जर सरकारने मंदिरे उघडली नाही, तर मंदिरांची कुलुपे तोडून देवाला भेटू, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

सरकारला ऐकू येत नाही म्हणून शंखनाद!

सोमवारी सकाळपासून भाजपच्या आध्यात्मिक विभागाच्या वतीने राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन सुरु आहे. त्यासाठी नाशिक, पंढरपूर, पुण्यासह राज्यभर आंदोलन सुरु आहे. पुण्यात कसबा गणपती मंदिराच्या बाहेर भाजपचे आंदोलन सुरु होते. त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. मंदिर हे हिंदूंचे घर आहे, अण्णा हजारे स्वतः मंदिरात राहतात, आमची श्रद्धा आहे. लोकांच्या मानतील श्रद्धा कशी अडवणार? दोन वर्षे वारी नाही म्हणजे काय, तुम्ही विठ्ठलाला गाडीतून जाऊन भेटता, हिंदूंची स्थिती समजून घ्या, मंदिरांबाहेर शंखनाद सुरु आहे, कारण सरकारला ऐकू येत नाही, त्यांना दारूच्या दुकानदारांचे म्हणणे ऐकू येत आहे. संध्याकाळ पर्यंत मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला नाही, तर मंदिरांची कुलपे तोडून देवाला भेटू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

मंदिरांवर हजारो कुटुंबे अवलंबून! 

मंदिरावर अनेकांचे कुटुंब अवलंबून असतात, भक्तांकडून दान मिळाले नाही म्हणून मंदिरातील कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही, मंदिराबाहेरील दुकानांवर हजारो कुटुंबे अवलंबून असतात, त्याचे काय? एका वेळेला १० जण मंदिरात जातील, असा नियम करून मंदिरे उघडा, अन्यथा भाविक मंदिराचे कुलूप तोडून देवाला भेटतील, पुढच्या आठवड्यात जैनांचा सण आहे. केवळ हिंदूंचेच नाही तर अन्य धर्मियांच्याही श्रद्धा आहेत, असेही पाटील म्हणाले.

दारूच्या दुकानांकडून कोरोनाची तिसरी लाट येणार नाही का? 

सध्या दारूची दुकाने उघडी आहेत, घरोघरी दारू पोहचवली जात आहे. त्या माध्यमातून या कोरोनाची तिसरी लाट पोहचणार नाही का, तशी बहिरी या सरकारला वाटत नाही का? केवळ मंदिर उघडली म्हणून सरकारला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाटते का? , असा सवाल पाटील यांनी केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.