मालाड क्रीडा संकुलाला टिपू सुलतानच्या नावास विरोध; भाजप आणि बजरंग दल आक्रमक

मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन मुंबईतील राजकारण चांगलच तापलं आहे. आज या संकुलाबाहेर भाजपा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. भाजपा आणि बजरंग दलाकडून या नामकरणाला विरोध करण्यात येत आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तूतू-मैंमैं झाल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तर या सर्व वादातच पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं आहे.

बेस्टची हवा काढून वाहतुकीस अडथळा

यावेळी आंदोलनकर्त्यांनी अशी मागणी केली की, देशात एपीजे अब्दुल कलामसारखे लोक होऊन गेलेत, त्यांचं नाव द्या पण टिपू सुलतान यांचं नाव देण्यात येऊ नये. दरम्यान, आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेला नुकसानही पोहचवलं. काही ठिकाणी वाहनांची हवा काढून टाकत वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टच्या २७२ क्रमांकाच्या मार्गावरील मालाड पूर्वेतील मार्वे चौपाटी येथे जाणाऱ्या बसची हवा आंदोलनकर्त्यांकडून काढण्यात आली. हवा काढली तेव्हा बसमध्ये १०० च्या आसपास प्रवासी होते. बसमधील प्रवाशांनाही यासंदर्भात संताप व्यक्त केलाय. हिंमत असेल तर इतर वाहनांची हवा काढा, असे आव्हान देत सर्वसामान्य प्रवास करतात त्या बेस्ट बसलाच का लक्ष्य केलं जाते असा सवालही उपस्थितीत करण्यात आला.

(हेही वाचा – मुंबईकरांना अतिरिक्त जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी मोजावे लागणार जास्त पैसे)

आंदोलकांनी उपस्थितीत केला सवाल

क्रीडा संकुलाला अस्लम शेख जाणीवपूर्वक टिपू सुलतानचं नाव देत आहेत, असं आंदोलक म्हणाले. जेव्हा पर्यंत या संकुलाचं नाव बदललं जात नाही, तोपर्यंत या संकुलाचं उद्घाटन होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, त्यांच्या भूमीत टिपू सुलतान सारख्या व्यक्तीचं नाव देणं, म्हणजे अपमान आहे, तुम्हाला इथे हिंदूंना राहू द्यायचं नाही का, असा सवाल आंदोलकांनी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here