पोटनिवडणुकीसाठी भाजपचे ४०, तर मविआचे २० स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरणार

180

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकरिता येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी. याकरिता भाजपातर्फे महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाहन करण्यात आले होते. मात्र, निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे आता भाजप आणि महाविकास आघाडीने ही निवडणुक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. पोटनिवडणुकीकरिता भाजपने तब्बल ४० स्टार प्रचारकांची आणि मविआतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसने २० स्टार प्रचारकाची यादी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पाठवली आहे. यामध्ये केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांसह स्थानिक नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीष बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रविंद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडीक, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, संजय उर्फ बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे अशा ४० जणांचा प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, सुनील तटकरे, फौजीया खान, वंदना चव्हाण, आमदार एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, निलेश लंके, चिंचवड विधानसभा प्रभारी सुनील आण्णा शेळके, महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, अली शेख या २० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहे.

(हेही वाचा – Kasba, Chinchwad By-Election:…तर तुमचा पराभव निश्चित समजा; मनसेच्या नेत्याचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.