गुजरात निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ‘या’ क्रिकेटपटूच्या पत्नीला संधी

110

गुजरात विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजल्यानंतर आता पक्षांकडून तिकीट वाटपाला सुरुवात झाली आहे. सध्या गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकांसाठी आता पहिल्या टप्प्यासाठी उमेदावरांची यादी जाहीर केली आहे. 160 उमेदवारांच्या या यादीत हार्दिक पटेल आणि क्रिकेटपटू रविंद्र जडेजाच्या पत्नीचा देखील समावेश आहे.

‘या’ मतदारसंघांतून उमेदवारी

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना विरमगाम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले असून, रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांना भाजपकडून जामनगर उत्तर मतदारसंघातून तिकीट देण्याची घोषणा केली आहे. तसेच गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अहमदाबाद येथील घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून,गृहमंत्री हर्ष संघवी यांना मजूरा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

(हेही वाचाः Gujarat Election: गुजरात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले, ‘या’ तारखांना होणार निवडणुका! निवडणूक आयोगाची घोषणा)

38 आमदारांचे तिकीट कापले

तिकीट वाटप करताना भाजपने मोठे बदल केले आहेत. पहिल्या टप्प्यातील 160 उमेदावारांमध्ये 38 जुन्या नेत्यांचे तिकीट कापले आहे. 160 उमेदवारांपैकी सध्याच्या 69 आमदारांना भाजपने पुन्हा एकदानिवडणूक लढवण्याची संधी दिली असून, 38 आमदारांच्या मतदारसंघात नव्या चेह-यांना संधी दिली आहे. मुख्य म्हणजे भाजपचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले जात आहे.

हे नेते निवडणुकीपासून दूर

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी,नितीन पटेल,भूपेंद्र सिंह चुडासमा,आरसी फल्दू,प्रदिपसिंह जडेजा,सौरभ पटेल हे दिग्गज भाजप नेते 2022 ची विधानसभा निवडणूक लढवणार नसून ते पक्षासाठी काम करणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.