हरियाणा विधानसभेसाठी (Haryana Assembly Election) एकूण ९० जागा आहेत. या ठिकाणी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यासाठी राज्यातील सगळ्या राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजपाने बुधवारी, ०४ सप्टेंबर रोजी ६७ उमेदवारींची यादी जाहीर केली.
भाजापाच्या या यादीत मंत्रिपद नाकारणाऱ्या अनिल विज यांनाही अंबाला मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तर सैनी यांना लाडवा व अरविंद शर्मा यांना गुहाना जागेवर तिकीट मिळाले आहे. २०१९ मध्ये भाजपाने जननायक जनता पार्टीसोबत मिळून निवडणूक (Haryana Assembly Election) लढविली होती. यंदा जेजेपीने वेगळी चूल मांडली आहे. आज त्यांनी १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजपाकडे ४०, काँग्रेस ३१ अन्य १९ जागा आहेत. सैनी हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी कर्नाल लोकसभा मतदार संघातून खासदार होते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पदाचा राजीनामा द्यायला लावला होता. कर्नाल विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. (Haryana Assembly Election) पोटनिवडणुकीत सैनी कर्नालमधून आमदार झाले. परंतू, यावेळी भाजपाने सैनींना कर्नालऐवजी लाडवामधून तिकीट दिले आहे. यामुळे आता कर्नालमध्ये कोणाला तिकीट देणार याकडे लक्ष लागले आहे. काही महिन्यांपूर्वीच नेतृत्व बदल होऊन मुख्यमंत्री झालेले नायब सिंह सैनी यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. ६७ जणांची पहिली यादी जाहीर झाली आहे.
Join Our WhatsApp Community