ईडीच्या कार्यालयात भाजपचा पदाधिकारी डेस्क अधिकारी! संजय राऊतांचा आरोप

अशा नोटिसांमुळे शिवसेना वाकणार नाही आणि महाविकास आघाडीचे सरकारही पडणार नाही. तसेच सत्तेसाठी टपून बसलेल्या डोम कावळ्यांना काहीही फायदा होणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

77

अनिल परब यांना देण्यात आलेल्या ईडीच्या नोटिशीचे टायमिंग बघा. भाजपाचे नेते आधीच म्हणत होते, ‘आता अनिल परब’…’आता अनिल परब…’ हे काय संकेत होते. याचा अर्थ भाजपच्या नेत्यांना ईडी कुणाला नोटीस देणार हे आधीच माहित होते, याचा अर्थ भाजपाचा अधिकारी ईडीच्या कार्यालयात डेस्क ऑफिसर म्हणून नेमण्यात आला आहे, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

आम्ही नोटिशीला कायदेशीर उत्तर देऊ!

ईडी कुणाला नोटीस देणार हे किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना आधीच कळते, त्यानंतर त्यांची बडबड सुरु होते. या नोटिसा म्हणजे प्रेमपत्र आहे. आम्ही त्याला कायदेशीररित्या सामोरे जाऊ, तसेच यंत्रणेला सहकार्य करू, अनिल परब हेदेखील कायद्याचे जाणकार आहेत, ते त्याला उत्तर देतील. अशा नोटिसा माझ्याही घरी आल्या. त्यामध्ये कुठलाही विषय नसतो, केवळ हजर रहा, असे सांगितले जात असते, असेही राऊत म्हणाले.

डोम कावळ्यांचा फायदा होणार नाही!

अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत, पण त्या आधी ते शिवसेनेचे नेते आहेत. अशा नोटिसांमुळे शिवसेना वाकणार नाही आणि महाविकास आघाडीचे सरकारही पडणार नाही. तसेच सत्तेसाठी टपून बसलेल्या डोम कावळ्यांना काहीही फायदा होणार नाही, असे सांगत केंद्रीय मंत्र्यांवर कायदेशीर कारवाई झाली आहे. देशात कुणावरही अशी कारवाई झाली असती. माझ्यावरही होईल, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे म्हणून परबांवर कारवाई झाली, असे होत नाही, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अनेकजण असतात, आम्हाला अशा नोटिसांचा फरक पडत नाही, असेही राऊत म्हणाले.

भाजपप्रणीत सरकारांत मंदिर बंद आहेत!

देशभरात मंदिरे उघडत नाही. केंद्रानेच तसे निर्देश दिली आहेत. भाजपच्या सरकार असलेल्या राज्यांत तरी मंदिरे उघडली आहेत का? केंद्रात भाजपाचे हिंदुत्वाचे सरकार आहे, त्यांना जास्त काळजी पाहिजे. हे सरकार दोन वर्षे पूर्ण केली आहेत आणि पाच वर्षे पूर्ण करील. हे सरकार पडत नाही म्हणून लव्ह लेटर पाठवत आहे. परंतु म्हणून आम्ही कुणाला धमकावणार नाही. कायदेशीर उत्तर देऊ. शेतकऱ्यांवर हल्ला होणे हे तालिबानी मानसिकता आहे. जो शेतकरी न्यायासाठी बसतो, त्यांची डोकी फोडण्याची भाषा अधिकारी करतो, हे चुकीचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.