जांबोरी मैदान तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है; शेलारांचा सूचक इशारा

96

वरळीच्या जांबोरी मैदानात भाजपने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शिवसेनेवर मात केली आहे. वरळीत शिवसेनेचे तीन आमदार आणि एक खासदार असून शिवसेनेला वरळीचे जांबोरी मैदान मिळवता आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. अशातच आज भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारांनी काही सूचक विधाने केली आहेत.

(हेही वाचा- आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात ‘भाजप’चं ढाक्कुमाक्कुम… ढाक्कुमाकुम..!)

काय म्हणाले शेलार

गड कोणाचा, कोणी ठरवलं? गड ठरवणं हे शेलार मामाशिवाय कोणी ठरवू शकत नाही? आदित्य ठाकरे हे युतीत निवडून आले आहेत. त्यामुळे आम्ही गड मानत नाही. आम्ही मुंबईत २२७ ठिकाणी दहीहंडी साजरा करत आहोत. जांबोरी मैदान तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है, असा सूचक इशाराही आशिष शेलार यांनी दिला आहे. मुंबईत माध्यमांशी ते बोलत होते. पुढे ते असेही म्हणाले की, वरळी हा शिवसेनेचा गड आहे हे आम्ही मानत नाही. आदित्य ठाकरे हे युतीतून निवडून आले आहेत, त्यामुळे गड वैगरे मानायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे गड कोणाचा, कोणी ठरवलं? गड ठरवणं हे शेलार मामाशिवाय कोणी ठरवू शकत नाही? असे शेलार म्हणाले.

राज्य सरकारकडून गोविंदांपथकांना गोड बातमी

दरम्यान, दहिहंडी अवघ्या दोन दिवसांवर आली असताना, राज्य सरकारने गोविंदांपथकांना गोड बातमी दिली आहे. यंदा दहिहंडी पथकातील गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गोविंदांना शासनाने विमा कवच द्यावे, अशी मागणी दहिहंडी पथकांकडून करण्यात आली होती. त्याची दखल घेत शासनाकडून गोविंदा पथकातील गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विम्याचे प्रीमियम शासनाकडून भरले जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.