भाजप आणि ठाकरे सरकार पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला गुडीपाडव्याच्या कार्यक्रमावरून चांगलेच धारेवर धरले आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात दरवर्षी हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्यानिमित्त शोभायात्रा काढली जाते. मात्र, यंदाच्या शोभायात्रांना राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. यावरून शेलारांनी निशाणा साधताना असे म्हटले की, हिंदू सण म्हटले की तुमच्या हाताला लकवा का मारतो? आणि राम भक्तांचा कार्यक्रम म्हटला की शिवसेनेची बोटचेपी भुमिका का होते? असा सवाल शेलारांनी सरकार व शिवसेनेला विचारत शोभायात्रांना परवानगी देणयाचीही मागणी केली आहे.
काय म्हणाले शेलार?
गुढीपाडवा नववर्षाच्या शोभा यात्रा निघतात. तसेच राम जन्माला देखील मिरवणूका निघतात पण याच्या परवानगीची सष्टता नसल्याचे शेलारांनी म्हटले आहे. तसेच ही भुमिका गोंधळात टाकणारी आहे. काही ठिकाणी तर परवानगी न देणारी आहे. सभागृहात मी हा मुद्दा उपस्थित केला होता. माननीय गृहमंत्र्यांनी उत्तर देताना यावर महसूल विभाग आणि आमच्या अन्य विभागाकडून येईल, अशी बोलवण केली होती, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – बुली बाई आणि सुली डील्स ऍप प्रकरणात आरोपींना सशर्त जामीन मंजूर )
यापुढे आम्ही हे आम्ही चालू देणार नाही
पण आता मिळालेल्या माहितनुसार पोलिसांनी कहरच केलाय, मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. आतंकवादी ड्रोन किंवा अन्य माध्यमांचा वापर करून हल्ला करणार आहे, असे कारण देण्यात आलंय. 10 मार्च ते 8 एप्रिल 144 कलम लावण्यात आले आहे. शिवसेना कार्यक्रम करते तेव्हा ही कारणं येत नाही. हॅप्पी ट्रीट आणि वांद्रे वंडर लँड चालते. मात्र, गुढीपाडवा चालत नाही. यापुढे आम्ही हे आम्ही चालू देणार नाही, असे अशिष शेलार यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community