आशिष शेलारांनी शिवसेनेच्या ‘त्या’ निर्णयाचा असा घेतला बदला

211

वांद्रे किल्ला ते माहिम किल्ल्यापर्यंत महापालिकेच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या बोर्डवॉक तसेच सायकल ट्रॅक बांधण्याचे कंत्राट कामच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने रद्द केले. तब्बल २१८ कोटी रुपयांचे हे कंत्राट तत्कालिन ठाकरे सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून देण्यात आले होते. मात्र, एका बाजूला हे काम पुढे रेटताना वांद्रे किल्ल्याच्या सुशोभिकरण कामाचा प्रस्ताव महापालिकेतील तत्कालिन शिवसेनेने अडकवून ठेवत एकप्रकारे भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार ऍड आशिष शेलार यांनी घेतला. शेलार यांनी आजवर अडकून पडलेला वांद्रे किल्ला सुशोभिकरणाचा प्रस्ताव विद्यमान प्रशासकांकडून मंजूर करून घेतानाच दुसरीकडे वांद्र किल्ला ते माहिम किल्ला दरम्यानच्या सायकल ट्रॅकच्या कामचा मंजूर केलेला प्रस्ताव रद्द करून एकप्रकारे राजकीय बदला घेतला.

( हेही वाचा : फक्त ६ हजारात उदयपूर फिरण्याची संधी! IRCTC चे स्वस्त मस्त टूर पॅकेज )

वांद्रे किल्ला ते माहिम किल्ल्यापर्यंत सुमारे २१८ कोटी रुपये खर्च करून सायकल ट्रॅक बनवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. शिवसेना युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेऊन यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नेमणूक केली होती. राज्यात आणि महापालिकेत सत्ता असल्याने आदित्य ठाकरे यांनी हा प्रकल्प पुढे रेटत याला मंजुरी मिळवून घेतली होती. परंतु राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी महामार्गावरील रस्त्यांच्या कामांपेक्षाही या प्रकल्पांवर खर्च होणार असल्याने एकप्रकारे जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचे सांगत या प्रकरणी सरकारकडे तक्रार केली होती. त्यामुळे हे काम रद्द करून शेलार यांनी जानेवारी २०२० पासून तत्कालिन महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने अडकून ठेवलेल्या वांद्रे किल्ला सुशोभिकरण कामाचा बदला घेतल्याचे बोलले जात आहे.

जानेवारी २०२० मध्ये उद्यान कक्षाच्या माध्यमातून एच/ पश्चिम विभागातील वांद्रे किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला होता. सुशोभीकरणामध्ये किल्ल्याच्या मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंती पाडून, त्या भिंतींची पुनर्बांधणी करणे, प्रवेशद्वार बनवणे, शहरी वन निर्माण करणे आदी कामांचा समावेश होता. या कामासाठी महापालिकेने एपीआय सिव्हीलकोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवडही केली होती. या कंपनीने विविध करांसह २०.६२ कोटीं रुपयांची बोली लावत हे काम मिळवले होते. परंतु हा प्रस्ताव शीव, माहिम, वरळी आदी किल्ल्यांचे एकत्र प्रस्ताव सादर करावे असे कारण देत हा प्रस्ताव तत्कालिन महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने फेरविचारासाठी परत पाठवत फेटाळला होता. परंतु पुढील तीन वर्षांत वांद्रे किल्ल्याच्या सुशोभिकरणाबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नाही. परंतु दुसरीकडे वरळी किल्ल्याच्या कामांसाठी विशेष पुढाकार घेतला गेला आणि विद्युत रोषणाईसह सुशोभीकरण केले गेले. त्यामुळे जर माहिम, वरळी आणि वांद्रे किल्ल्याच्या विकासाचा एकत्र प्रस्ताव सादर केला जाणार होता, तर अशाप्रकारे स्वतंत्र प्रस्ताव आणून विकासाची कामे का केली जात आहेत,असाही प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता.

परंतु प्रशासनानाला हाताशी धरून वांद्रे किल्ला सुशोभीकरणाचा अडकून ठेवलेला प्रस्ताव शेलारांनी सोडवला. या प्रस्तावाला प्रशासकांची मंजुरी मिळवत या किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे आधी वांद्रे किल्ला सुशोभीकरणाचा प्रस्ताव मंजूर करत शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील वायफळ खर्चाचा वांद्रे किल्ला ते माहिम किल्ला सायकल ट्रॅकचे कंत्राट रद्द करत एकप्रकारे हा प्रस्ताव समुद्रातच बुडवून टाकला असे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.