तामिळनाडूच्या मत्स्यव्यवसाय मंत्री आणि द्रमुकच्या नेत्या अनिता आर. राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध भारतीय जनता पक्षाने (भाजप) रविवारी केला. कारवाईसाठी पोलीस आणि निवडणूक आयोगाशी संपर्क साधणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. (BJP Attacks DMK Minister Anitha Radhakrishnan)
तामिळनाडूच्या मत्स्यव्यवसाय मंत्री अनिता राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. यावर, इंडि आघाडीचा विवेक संपलेला आहे, असे म्हणत भाजपाने टीका केली आहे. द्रमुक नेत्याने पंतप्रधानांविरोधात अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल भाजपाच्या तामिळनाडू शाखेने कारवाईसाठी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे संपर्क साधणार असल्याचे सांगितले.
(हेही वाचा –Nagpur-Madgaon Train:नागपूर-मडगाव रेल्वेगाडीला जून अखेरपर्यंत मुदतवाढ )
द्रविड मुनेत्र इकाई (डीएमके) चे नेते राधाकृष्णन यांनी पंतप्रधानांविरोधात अपमानास्पद टिप्पणी करून खालच्या दर्जाचे वर्तन केले आहे, असे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी ‘एक्स’ वर पोस्ट केले.
अनुराग ठाकूर यांचा दिल्लीत निषेध
नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राधाकृष्णन यांच्या पंतप्रधानांविरोधातील वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. लोकशाहीत अशा भाषेला स्थान नसल्याचे सांगितले. ठाकूर म्हणाले की, जेव्हा मनुष्याच्या विनाशाची वेळ जवळ येते, तेव्हा सर्वप्रथम त्याचा विवेक मरतो. इंडि आघाडीतील नेत्यांचे विचार आणि त्यांनी केलेली विधाने ऐकल्यावर त्यांच्यातील विवेक नष्ट झाला आहे. त्यांची विचार करण्याची क्षमता संपुष्टात आली आहे, हे लक्षात येते. अनुराग ठाकूर यांनी इंडि आघाडीबाबत केलेले हे निषेधाचे वक्तव्य ‘X’वर शेअर केले आहे.
Join Our WhatsApp Communityजब नाशक मनुज पर छाता है,
पहले विवेक मर जाता है।मोदी जी के प्रति इंडी अलायंस के नेताओं के विचार और बयान सुन कर यही लगता है कि इस गठबंधन के नेताओं की सोच-समझ की शक्ति ख़त्म हो चुकी है, इनका विवेक मर चुका है। pic.twitter.com/jCs71z4SrY
— Anurag Thakur (मोदी का परिवार) (@ianuragthakur) March 24, 2024