“निश्चयाचा महामेरू कसले, पवार तर…”, सामनातील बातमी पोस्ट करून भाजपचा निशाणा

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ‘बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती’ असं कॅप्शन देऊन सामनामधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक बातमी पोस्ट केली आहे. यामध्ये सामनाच्या पहिल्या पानावर बाळासाहेब ठाकरे मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताय, असा फोटो आहे. तसेच “निश्चयाचा महामेरू कसले, पवार तर सोनियांचे पायधरू” असं त्या बातमीचे शीर्षक असल्याचे दिसतेय.

(हेही वाचा –सर्वच औषध पुरवठादारांनी हाफकिनला काळ्या यादीत टाकले, वाचा काय आहे कारण)

भातखळकरांचा ट्विटमधून हल्लाबोल

रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावरून शिवसेना आमदार महेश शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. माझी उंची शरद पवार यांच्या उंचीपेक्षा दोन इंच लहान आहे असं त्यांनी म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आमदार महेश शिंदे यांनी आपला मेंदू तपासून पाहावा असं म्हटलं होतं. यावरच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून टीका केली आहे.

झेपत असेल तर थोडं काम करून दाखवा

यापूर्वी देखील भाजपने बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचे संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका करणारे ट्विट केले आहे. त्यात म्हटलं की, घरी बसण्याचा निकष लावला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात मोठे आहेत. त्यांची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. कुंभकर्णसुद्धा सहा महिन्यांनी जागा व्हायचा, हे कुणी तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगण्याची गरज आहे. याशिवाय भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावत असेही म्हटलं होतं, “ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो” म्हणजे टीकाकारांचे टक्कल करणे, डोळा फोडणे, खटला भरणे हेच ना? झेपत असेल तर थोडं काम करून दाखवा.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here