अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी जी जमीन खरेदी करण्यात आली, त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप झाल्यानंतर आता विरोधकांनी भाजपाला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट)वर हा भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा श्रीरामावरील श्रद्धेचा अपमान आहे, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजप आणि विहिंपला लक्ष्य केले. त्यावर प्रत्युत्तर देतांना भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर पलटवार केला.
हे असले भाकड हिंदुत्ववादी, राम मंदिरावर गरळ ओकणारच… pic.twitter.com/pHgZtXH6c5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 14, 2021
सुपारी कातरून तोंडात टाकू!
यावेळी आमदार भातखळकर यांनी ट्विटद्वारे थेट शिवसेनेला लक्ष्य केले. सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे. ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!, असा शब्दांत भातखळकर यांनी सेनेला प्रत्युत्तर दिले.
सोनिया मातोश्रींची सुपारी घेऊन शिवसेना हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करते आहे.
ही सुपारी कातरून तोंडात टाकण्याची ताकद हिंदू समाजात आहे हे विसरू नका!— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 14, 2021
…तर सेनेने १ कोटी परत घेऊन टिपूचा मजार बांधवा!
या भ्रष्टाचारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी खुलासा करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच राम मंदिराच्या निर्माणासाठी समस्त हिंदूंनी निधी दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही १ कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्या पैशाचा भ्रष्टाचार होणार असेल तर हे चुकीचे आहे, असेही राऊत म्हणाले. त्यावर अतुल भातखळकर यांनी शिवसेनेने आता ‘हजरत टिपू’चा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे…लोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही.
Join Our WhatsApp Communityलोकांनी श्रद्धा आणि विश्वासाने राम मंदिरासाठी देणग्या दिल्या आहेत, त्याचा व्यवस्थित हिशोबही ठेवला जातो. शिवसेनेला विश्वास नसेल तर त्यांनी दिलेले एक कोटी परत मागावे. त्यातून एखादी टिपूची मजार बांधावी. शिवसेनेच्या जीवावर मंदिर निर्माण सुरू नाही. @rautsanjay61 pic.twitter.com/Llw1CkUdNA
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 14, 2021