“… म्हणून शिवराळ भाषेचा वापर सुरूये”, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

131

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी मोठा खळबळजनक दावा केला आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूरात पत्रकार परिषदेत घेत असताना त्यांनी इशारा देत असेल सांगितले की, घाबरू नका, दिशा सालियन प्रकरणात ७ मार्च रोजी सर्व पुरावे समोर येणार आहे. दिशा सालियन प्रकरणाता उलगडा होणार असून त्यासंबंधित सर्व पुरावे तयार असून यानंतर या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे, कोणाकोणाला तुरुंगात जावे लागेल हेही स्पष्ट होईल, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये, यासाठीच शिवराळ भाषा वापरणं सुरू असल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे.

राणेंनंतर चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियन हिच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता. त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. तिने आत्महत्या केली नव्हती तर तिची हत्या करण्यात आली होती, असेही राणेंनी म्हटले होते. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी हजर होती? असा सवालही राणेंनी उपस्थित केला. राणेंनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

(हेही वाचा – अमेरिका, चीन, फ्रान्स व इटलीनंतर महाराष्ट्रात पहिली ‘BSL-3’ मोबाईल प्रयोगशाळा, वाचा काय आहेत वैशिष्ट्यं?)

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

“राजकारण नाही, दूध का दूध और पाणी का पाणी हो जायेगा. घाबरू नका, ७ मार्चनंतर सर्व पुरावे समोर येतील. त्यात कुणाचा सहभाग आहे, कोणाकोणाला तुरुंगात जावं लागेल हे स्पष्ट होईल. उसणं अवसान आणणं आणि शिवराळ भाषेचा वापर यामुळेच सुरू आहे. दिवा विझण्याआधी फडफडतो. आपल्याला वाटतं दिवा खूप प्रज्वलित झाला. ती विझण्यापूर्वीची फडफड आहे.” , असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दिशा सालियन प्रकरणी राणेंचं सूचक ट्वीट

तर दिशा सालियन प्रकरणाबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. नितेश राणे यांनी ट्विट केलं असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले की, ८ जूनच्या रात्री पार्टीतून दिशाला एका काळ्या रंगाच्या मर्सिडीज गाडीतून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आले. सचिन वाझे यांच्याकडेही काळ्या रंगाची मर्सिडीज आहे. ही गाडी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. ही तिच कार आहे का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.