राज्यात सध्या राज्यसभेत निवडणुकीची चर्चा होताना दिसतेय. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपाने राज्यसभा निवडणूक बिनविरोध केली जाईल, त्या बदल्यामध्ये विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी ऑफर महाविकास आघाडीने दिली आहे. यानंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
या निवडणुकीत आम्ही राज्यसभेची निवडणूक लढणार असल्याचे आघाडीच्या नेत्यांना स्पष्ट केले. राज्यसभेला आम्हाला पाठिंबा द्यावा, विधान परिषदेला आम्ही पाठिंबा देऊ, असा प्रस्ताव आघाडीने दिला होता. पण आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्हाला राज्यसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही त्यांना उलटा प्रस्ताव दिला. तुम्हीच आम्हाला राज्यसभेला पाठिंबा द्या. आम्ही तुम्हाला विधान परिषदेत पाठिंबा देऊ, असं आघाडीच्या नेत्यांना सांगितले. आम्ही आमचा उमेदवार मागे घेणार नाही. या संदर्भात आमचं केंद्राशी बोलणं झालं आहे. आमच्या पक्षश्रेष्ठीनेही आमचीच भूमिका योग्य असल्याचे सांगितले. दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी यू गो विथ दॅड स्टँड असे सांगितले. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणारच आहोत. आघाडीचे आमचा प्रस्ताव मान्य केला नाही तर ही निवडणूक होणारच, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – वडेट्टीवार म्हणाले, … तर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती आयोगाला करावी लागेल )
पुढे चंद्रकांत पाटील असेही म्हणाले, “महाविकास आघाडीच्या नेत्यांचा गुरूवारी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा निरोप आला. तीन पक्षाचे ज्येष्ठ नेते आले होते. राज्यसभेची निवडणूक १० तारखेला होणार आहे. आजवर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे. राज्यसभेत भाजपला ३ जागा मिळाव्यात, विधान परिषदेसाठी काही विचार करता येईल. त्यांनी आम्हाला सांगितले की विधान परिषदेच्या ५ जागा देऊ, पण आम्हाला राज्य सभा जास्त महत्वाची आहे. आम्हाला ११ ते १२ मतं कमी पडतायत. त्यांच्याकडे असलेली संख्या आमच्या ३० च्या पुढे जात नाही.
Join Our WhatsApp Community