भाजपाचे मुख्यमंत्री Sheeshmahal मध्ये रहाणार नाहीत ?; दिल्ली भाजपाने केली ‘ही’ मागणी

Sheeshmahal : ६, फ्लॅगस्टाफ रोड हे निवासस्थान त्याच्या मूळ स्वरूपात आणा - भाजपाची मागणी

68
भाजपाचे मुख्यमंत्री ‘शीशमहल’मध्ये रहाणार नाहीत ?; भाजपाने केली 'ही' मागणी
भाजपाचे मुख्यमंत्री ‘Sheeshmahal’मध्ये रहाणार नाहीत ?; भाजपाने केली 'ही' मागणी

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान अर्थात ६, फ्लॅगस्टाफ रोड दिल्ली विधानसभा निवडणूक (Delhi Assembly Elections) काळात विशेष चर्चेत राहिले. दिल्लीत सत्तेत येतांना कोणत्याही सुविधा घेणार नाही म्हणणारे केजरीवाल यांनी शासकीय निवासस्थानात स्वतःसाठी अनेक आलिशान सुविधा करून घेतल्या. भाजपाने यावर आक्षेप घेत आम आदमी पक्षाला घेरले. दिल्लीकरांच्या पैशांमधून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी स्वत:साठी हा शीशमहल बांधून घेतल्याची टीकाही केली गेली. आता हाच शीशमहल (Sheeshmahal) ओस पडण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीचे भावी मुख्यमंत्री या बंगल्यात राहणार नसल्याचं भाजपाने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : भारताला चॅम्पियन्स करंडक जिंकायचा असेल तर रोहित, विराटला फॉर्म गवसायला हवा – मुरलीधरन )

दिल्लीतील ६, फ्लॅगस्टाफ रोड या निवासस्थानी पुढचे मुख्यमंत्री राहणार नाहीत, असे दिल्ली भाजपाचे (Delhi BJP) अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना (V. K. Saxena) यांना कळवले आहे. शिवाय, या निवासस्थानाचं पुढे काय करायचं? यासंदर्भात दिल्ली सरकार नंतर निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘शीशमहल’ मूळ स्वरूपात आणा – भाजपाची मागणी

भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) रोहिणी मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार व माजी विरोधी पक्षनेते विजेंदर गुप्ता यांनीही उपराज्यपालांना पत्र लिहून ६, फ्लॅगस्टाफ रोड हे निवासस्थान त्याच्या मूळ स्वरूपात आणण्याची विनंती केली आहे. या निवासस्थानाची पुनर्बांधणी करताना केजरीवाल यांनी आसपासच्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप निवडणूक काळात केला होता. त्यालाच अनुसरून आता ही मागणी करण्यात आली आहे.

काय आहेत आरोप ?

“केजरीवाल यांनी या शासकीय निवासस्थानाची (Sheeshmahal) पुनर्बांधणी करताना १० हजार चौरस मीटरचे बांधकाम ५० हजार चौरस मीटरपर्यंत वाढवले. त्यासाठी आसपासच्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले. त्यात ४५ व ४७ राजपूर रोडवरील ८ टाईप व्ही फ्लॅट आणि ८ए व ८बी फ्लॅगस्टाफ रोड हे बंगलेही त्यांनी अतिक्रमित केले”, असा आरोप विजेंदर गुप्ता यांनी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.