राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्तानाट्य सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांची ताकद वाढत असून त्यांना शिवसेनेच्या आमदारांसह मंत्र्यांचा पण पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी शिवसेनेने दहिसरमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
काय दिले चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर
संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केलेल्या टिकेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर देत जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्या त्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, कंपाऊंडरची ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये रवानगी करण्याची वेळ आली आहे.
कंपाऊंडरची ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये रवानगी करण्याची वेळ आली आहे… @rautsanjay61 pic.twitter.com/xjZzplKu5p
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 26, 2022
काय म्हणाले होते राऊत
शिवसेनेच्या दहिसर येथील मेळाव्यात संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. जे 40 आमदार गेले आहेत ते एका बापाचे असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा. या 40 आमदारांचे मृतदेह येथे येतील, त्यांचे मृतदेह थेट शवागृहात पाठवू. गुवाहटीतील कामाख्या देवी मंदिरात रेड्याचे बळी देतात, आम्ही 40 रेडे पाठवले आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली होती.
Join Our WhatsApp Community