महाविकास आघाडी नेहमीच भाजपच्या कुरघोड्या करताना दिसतंय. सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतना ‘अकेला देवेंद्र क्या करेगा,’ अशी टीका महाविकास आघाडीने भाजपवर करत त्यांना डिवचले होते. यानंतर भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची ताकद असताना ‘अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणताय! आरे, एकट्यानेच तुमच्या तिघांचाही धुर काढलाय, आता तिघांनाही समजल आहे की, अकेला देवेंद्र काय काय करतोय, असे म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
(हेही वाचा – आम्हाला कोणीही अडवू शकत नाही, असे म्हणत राज ठाकरेंचा पठ्ठ्या अयोध्येत दाखल)
ठाकरे सरकारवर चित्रा वाघ यांचा निशाणा
राज्यसभा निवडणुकीसाठी राज्याच्या राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. अशातच नेत्यांचे दौरे आणि भेटीगाठी सुरू आहे. दरम्यान, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे महिला मेळाव्यात त्यांनी महाविकास आघाडीला धारेवर धरत त्यांचा खरपूस समाचार चित्रा वाघ यांनी घेतला आहे. पुढे त्या म्हणाल्या की, राज्यसभेच्या दोन जागा तर येणारच मात्र तिसरी जागाही निवडून येणार आहे. राज्यात सरकारी दवाखान्यात सामान्य नागरीक जाण्यासाठी घाबरत आहे. राज्यातील मोठे नेतेही सरकारी दवाखान्यांवर विश्वास ठेवत नाही तर गोरगरीबांनी कसा विश्वास ठेवायचा?, असा सवालही त्यांनी उपस्थित करत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
ही बाब दुदैवी आणि लाजीरवाणी गोष्ट
मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पहाणाऱ्यांना खोचकपणे बोलताना वाघ म्हणाल्या, पुढचा मुख्यमंत्री आमचाच म्हणणाऱ्या राज्यातील तीन पक्षांच्या आघाडीची गोडी कडू झाली आहे. मात्र, सत्तेसाठी आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी ही गोडी घेत आहेत. राज्यात एवढं गंभीर प्रश्न असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची स्वप्न पडतात, ही बाब दुदैवी आणि लाजीरवाणी गोष्ट आहे.