‘पुन्हा माझ्या नादी लागू नका, तोंडावर आपटाल’; चित्रा वाघ यांचा इशारा

120

भाजपच्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांच्यावर सोलापूर प्रकरणी निशाणा साधत पुन्हा माझ्या नादी लागू नका , तोंडावर आपटाल असा इशारा त्यांनी ट्विट करत दिला आहे.

काय म्हणाले चित्रा वाघ

फक्त नाव “विद्या”असून विद्या येत नाही हो…सोलापूर प्रकरणात ना पिडीतेली भेटलो ना आजपर्यंत तिला पाहिलं पण तुम्हाला मात्र जीभ उचलली की टाळ्याला लावण्याची घाईचं फार असते. बाकी सुनेला छळणाऱ्या सासूच्या प्रसिद्धीसमोर बाकी सगळं फिकचं नाही का ? त्यामुळे पुन्हा नादी लागू नका माझ्या तोंडावर आपटाल, असा इशारा चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांना दिला आहे.

(हेही वाचा – राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार)

काय आहे सोलापूर पीडितेचे प्रकरण

शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरूणीने बलात्काराचा आरोप केला म्हणून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पिडीत तरूणीने चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले होते. पीडितेसह वाघ यांची १८ फेब्रुवारीला भेट झाली. त्यानंतर तिने २०१७ पासूनची घटना सांगितली. रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. इतकंच नाही तर चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन करण्यात आला आहे, अशी माहिती त्या पीडितेने चित्रा वाघ यांना दिली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.