नाना पटोले यांच्यावर होणार कारवाई; गृहमंत्र्यांनी दिले आश्वासन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल नाना पटोले यांच्यावर कारवाई केली जाईल

111

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. नाना पटोले यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.

पटोलेंनी मोदींवर केलं अशोभनीय वक्तव्य

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्यास सूचना द्यावी, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नसून त्याच्यावर कारवाई करावी यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण केले होते. साखळी उपोषण सुरू असताना पोलिसांनी मंगल प्रभात लोढा तसेच भाजपा कार्यकर्त्यांना अटक देखील केली होती.

(हेही वाचा – मुख्यमंत्री ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाला पवारांचाच विरोध!)

पटोलेंच्यावर योग्य ती कारवाई होणार

मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी नाना पटोले यांच्यावर कारवाईसाठी दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन दिले होते. दिलीप वळसे पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर योग्य ती कारवाई होईल, असे आश्वासन दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.