कोल्हापूरच्या आखाड्यातून भाजपने लोकसभेसाठी दंड थोपटले; भाजप-शिवसेना एकत्र लढणार

123

शिवजयंतीच्या मुहूर्तावर भाजपने रविवार, १९ फेब्रुवारी रोजी कोल्हापुराच्या आखाड्यातून लोकसभा निवडणूक २०२४ साठी दंड थोपटले. भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी विरोधकांवर कडक प्रहार करत ही निवडणूक पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी नाही, तर महान भारत, समृद्ध भारत बनवण्याच्या संकल्पासाठीची निवडणूक म्हणून लढायची आहे. आम्ही राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहोत, विरोधक सगळे एकत्र येणार आहेत, पण मी यत्किंचितही भयभीत नाही, कारण  भाजपाकडे दैवदुर्लभ कार्यकर्ते आणि पंतप्रधान मोदी यांच्यासारखे महान नेतृत्व  आहे, त्यामुळे पराभव दूरदूर पर्यंत दिसत नाही, अशा शब्दांत विश्वास व्यक्त केला.

२००४ ते २०१४ पर्यंत १२ लाख कोटीचे घोटाळे झाले

२०१४ च्या आधीच भारत कसा होता, त्यावेळी शरद पवारही मंत्री होते. २००४ ते २०१४ पर्यंत असे सरकार चालले की, त्यात पंतप्रधानांना कुणी पंतप्रधान म्हणत नव्हेत आणि सगळे मंत्री स्वतःला पंतप्रधान समजत होते. अनेक घोटाळे उघड झाले, १२ लाख कोटीचे घोटाळे झाले, पाकिस्तानमधून घुसखोर करत दहशतवादी सैन्याचे शीर कापून घेऊन जायचे आणि त्यांची विटंबना करायचे, देशाची अंतर्गत सुरक्षा बिघडली होती, भारताचा झेंडा फडकवण्यासाठी विरोध व्हायचा, नक्षलवादी कारवाया वाढल्या होत्या, जगभरात देशाची प्रतिमा ढासळली होती. त्यामुळे २०१४ मध्ये आम्ही देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि जनसमुदाय मोदींच्या मागे लोटला आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा गैर काँग्रेसने पूर्ण बहुमताच्या जोरावर सरकार बनवले, असेही अमित शहा म्हणाले.

(हेही वाचा २५ वर्षांत युतीत सडले म्हणणारे अडीच वर्षांत संपले – देवेंद्र फडणवीस)

मोदींनी ७० वर्षांची कामे ७ वर्षांत पूर्ण केली

भारताची सीमा आणि सैन्याशी छेडछाड केली तर महागात पडेल, असा संदेश सर्जिकल स्ट्राईकने दिला. २०१४ आधीपर्यंत कधी तरी तुम्ही देशात राम मंदिराची उभारणी शांततेत होईल, असे वाटत होते का, पंतप्रधान मोदी यांनी हे करून दाखवले, मंदिर उभारण्याचे काम सुरु झाले आणि २०२४ पर्यंत पूर्ण होईल, नुसते राम मंदिरच नाही, तर देशातील महत्वाच्या तीर्थस्थानांचा विकास सुरु झाला आहे. ट्रिपल तलाक संपेल, असा तुम्ही कधी विचार केला होता का, तेही पंतप्रधानांनी केले आहे. समान नागरी कायद्याचा कुणी विचार तरी केला होता का, एकच देशात दोन पंतप्रधान, दोन विकास, दोन निशाण, मोदींनी ३७० कलम फेकून दिले, तेव्हा शरद पवार, राहुल गांधी, ममता, समता, सपा सगळ्यांनी विरोध केला. काश्मिरात खून खराबा होईल म्हणत होते, पण तिथे काहीच घडले नाही. आज काश्मिरात विकास होत आहे. मोदींनी ७० वर्षांची कामे ७ वर्षांत पूर्ण केली. एकही विरोधी पक्ष आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकला नाही. महाराष्ट्रात कोल्हापुरात एनडीएचा मोठा गड तयार करायचा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.