BJP Convention: शिर्डीत होणार भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन; या बैठकीत अमित शाहांसह २२ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार

88

विधानसभा निवडणुकीतील (Assembly Elections) अभूतपूर्व यशानंतर भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान, शिर्डी (BJP Convention, Shirdi) येथे भाजपाचे ११ व १२ जानेवारी रोजी राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे. राज्यस्तरीय अधिवेशन तब्बल २२ हजार पदाधिकारी या अधिवेशनाला येणार असून त्यांच्या निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे होत असलेल्या या अधिवेशनाला महत्त्व आले आहे. पक्षाच्या पुढील अध्यक्षाचीही या अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता आहे.  (BJP Convention)

या अधिवेशनात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासह केंद्रीय मंत्री, पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत. अधिवेशनाच्या नियोजनाची सूत्रे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेंकडे (Radhakrishna Vikhe-Patil) आहेत. तर  स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधत होणाऱ्या या अधिवेशनासाठी माजी खासदार सुजय विखे आठ दिवसांपासून शिर्डीत तळ ठोकून आहेत. अधिवेशनासाठी साई संस्थानच्या प्रसादालयाशेजारील शताब्दी मैदानावर ३ भव्य शामियाने उभारण्यात आले आहेत. ११ तारखेला भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होऊन १२ तारखेला सकाळी नड्डा अधिवेशाचे उद्घाटन करतील. दुपारी शाह भाजपच्या मंत्री, खासदार, आमदारांसह १८ हजार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच पुढील वाटचालीच्या रणनीतीवर अधिवेशनात शिक्कामोर्तब होईल. शाह शिर्डीनंतर शनिशिंगणापूरलाही जाणार आहेत. 

(हेही वाचा – maa kamakhya temple : शिवसैनिकांना अभय देणार्‍या कामाख्या माता मंदिराचा अद्भुत इतिहास आणि परंपरा!)

आठ एकराचा शामियाना, १५ एकरावर पार्किंग

अधिवेशनासाठी आठ एकर जागेवर भव्य शामियाना उभारण्यात आला. त्यात पदाधिकाऱ्यांसाठी १५ हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. त्यात १ हजार व्हीआयपी खुर्च्यांचा समावेश आहे. ८० बाय ४० आकाराच्या मंचावर शाह, नड्डांशिवाय केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची आसन व्यवस्था आहे. १५ एकर जागा पार्किंगसाठी ठेवली आहे.

शिर्डी शहरातून कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे दुभाजक, त्यातील सिमेंट कुंड्या, विजेचे खांब याचा खुबीने वापर करून संपूर्ण मार्ग भाजपामय करण्यात आला आहे, दोन हजारावर झेंडे, २० स्वागत कमानी, फलक लक्ष वेधून घेत आहेत. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.