BJP Core Committee Meeting : महायुतीत समन्वयाचा अभाव नको, केंद्रीय नेत्यांच्या सूचना

107
BJP Core Committee Meeting : महायुतीत समन्वयाचा अभाव नको, केंद्रीय नेत्यांच्या सूचना

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असून महायुती सोबत समन्वय साधून काम करावे असा सल्ला भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मंगळवारी रात्री भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक राजधानीत राज्यातील नेत्यांसोबत झाली. (BJP Core Committee Meeting)

त्यावेळी लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या चुका टाळून तत्परतेने कामाला लागावे असा आदेशही देण्यात आला असल्याची माहिती आहे. तसेच कार्यकर्त्यांनी निराश न होता पुन्हा नव्या जोमाने राज्य जिंकण्याची तयारी करावी जेणेकरून लोकसभेची पुनरावृत्ती टाळता येईल. तसेच सभेत राज्यातील सर्वच महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. (BJP Core Committee Meeting)

बीजेपी केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट म्हटलं आहे की, कोण्या एका व्यक्तीच्या मर्जीने महाराष्ट्रात पक्ष चालू शकत नाही. कोअर कमिटीला सोबत घेऊनच पक्ष चालवावा लागणार आहे. भाजपाने एकत्रितपणे काम करायला हवे. महाराष्ट्रातील भाजपाच्या सर्वच जुन्या नेत्यांना सक्रीय करायला हवे. आत्तापासूनच उमेदवारांना तयारी सुरू करा. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या विधानसभा निवडणुकांमध्ये टाळा. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणायची आहे. महायुतीत समन्वयाचा अभाव नको अशा अनेक महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (BJP Core Committee Meeting)

(हेही वाचा – MPSC Revised Advt: समाज कल्याण विभागातील ४१ पदांसाठी नवी जाहिरात; सुधारित आरक्षणासह पदसंख्येत झाला बदल; जाणून घ्या सविस्तर)

वरीष्ठ नेत्यांनी केली राज्यातील नेत्यांची कानउघडणी

लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, दिल्लीतील नेत्यांनी त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. मात्र, महाराष्ट्रात एका नेत्याच्या मर्जीने पक्ष चालणार नसून कोअर कमिटीला सोबत घेऊनच पक्ष चालवावा लागणार असल्याचे वरिष्ठांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींवर दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांचे आता पूर्ण लक्ष राहणार आहे. (BJP Core Committee Meeting)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. महाराष्ट्रात देखील ४८ पैकी ४५ जागी महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा होता. मात्र, भाजपाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. यामागच्या कारणांचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीबरोबरच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा देखील आढावा घेण्यात आला. या बैठकीत भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी राज्यातील नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. इतकेच नाही तर राज्यात कोणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नसल्याचे वरीष्ठांनी स्पष्ट केले आहे. तसेच सर्वांना सोबत घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. (BJP Core Committee Meeting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.