कल्याण-डोंबिवलीत भाजपा पडणार गोंधळात, नगरसेवक ‘शिवबंधनात’

महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपाला निवडणुकीआधीच खिंडार पडणं, हा मोठा धक्काच म्हणावा लागेल.

91

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने भाजपाला मोठा धक्का दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधीच भाजपाच्या ६ नगरसेवकांनी पक्षाला रामराम करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे लवकरच भाजपाचे पाच ते सहा नगरसेवक शिवसेनेत एन्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे सर्व नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असून, त्यांच्या हाती शिवबंधन बांधले जाणार असल्याचे समजत आहे.

(हेही वाचा – साहित्य संमेलन आणि मराठी भाषा शुद्धीकार वीर सावरकरांचा सन्मान)

शिवसेनेचं ‘मिशन धनुष्य’ सुरू

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपाच्या ‘मिशन लोटस’ला जसेच्या तसे उत्तर देण्यासाठी शिवसेनेने आता ‘मिशन धनुष्य’ हाती घेतले आहे. गेल्या काही वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र आता शिवसेनेचे हे वर्चस्व हाणून पाडण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. पण कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपाला निवडणुकीआधीच खिंडार पडणं, हा मोठा धक्काच म्हणावा लागेल.

सत्ता काबीज करण्यास भाजपा प्रयत्नशील

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १२२ प्रभागांमध्ये एकट्या कल्याण मधील तब्बल २७ गावांचा सहभाग आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान, न्यायालयाच्या निर्णयावर कल्याण-डोंबिवली महापालिकेची पुढील प्रभाग रचना ठरणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असून, तशी व्यूहरचनाही आखली जात आहे. तर असेही सांगितले जात आहे की, यावेळी होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि मनसेची युती होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी निवडणूक लढवण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.