मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मागील एक वर्षाच्या कालावधीतील कामांचे मूल्यमापन करत प्रजाने जाहीर केलेल्या प्रगती पुस्तकात २२७ नगरसेवकांमधून गोरेगावच्या भाजप नगरसेविका प्रीती सातम यांना दहावा क्रमांक प्राप्त झाला आहे. प्रजा फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या कामांचे मूल्यमापन करत त्यांचे प्रगती पुस्तक जाहीर केले जाते. प्रजाच्या या अहवालात पहिल्या टॉप टेन नगरसेवकांमध्ये दहावा क्रमांक गोरेगाव मधील प्रभाग क्रमांक ५२ च्या भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी प्राप्त केला आहे.
(हेही वाचाः विरोधी पक्षनेते रवी राजा ठरले मुंबईतील सर्वोत्तम नगरसेवक)
उल्लेखनीय कामगिरी
प्रीती सातम यांनी महापालिकेत अनेक विषय हाताळत आवाज उठवला, तसेच अनेक ठरावाच्या सूचना करताना प्रशासनाला त्यानुसार कार्यपद्धत राबवण्यासाठी भाग पाडले. विविध विषयांवर त्यांनी पत्र लिहून प्रशासनाचे वेधून घेतलेले लक्ष आणि उपस्थित केलेले मुद्दे तसेच समिती व सभागृहातील त्यांची उपस्थिती या आधारे प्रजा फाऊंडेशनने त्यांना दहावा क्रमांक दिला आहे.
(हेही वाचाः मुंबई महापालिकेत काँग्रेसने शिवसेनेला टाकले मागे)
टॉप-१० आणि फ्लॉप-१०
पहिल्या दहामध्ये काँग्रेसच्या तीन, शिवसेनेच्या तीन आणि भाजपच्या चार नगरसेवकांचा समावेश आहे. तर तळातील सर्वात दहा नगरसेवकांमध्ये भाजपच्या चार नगरसेवकांचा समावेश आहे. शिवसेनेच्या दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अभासे आणि एमआयएम या पक्षांच्या प्रत्येकी एका नगरसेवकांचा त्यात समावेश आहे. तळातून पहिल्या क्रमांकावर एमआयएमच्या गुलनाझ मोहम्मद सलीम कुरेशी यांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community