Sanjay Raut : आदित्य ठाकरेंच्या हातात कोणत्या ब्रॅण्डची व्हिस्की? संजय राऊतांच्या ट्विटनंतर भाजपचा पलटवार

143

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो व्हायरल केला, ज्यामध्ये ते मकाऊ येथील कसिनोमध्ये होते आणि तिथे त्यांनी जुगारात साडेतीन हजार कोटी खर्च केल्याचा आरोप केला. यामुळे खळबळ उडाली असताना भाजपनेही त्याला पलटवार करण्यासाठी आदित्य ठाकरे याचा फोटो व्हायरल केला आहे, ज्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी मद्याचा ग्लास तोंडाला लावलेला आहे, त्यात भाजपने ‘आदित्य ठाकरेंच्या हातात कोणत्या ब्रँडची व्हिस्की’ असा सवाल केला आहे. अशा प्रकारे राज्याच्या राजकारणात एक्स वॉर सुरु झाले आहे.

संजय राऊत यांनी काय केले ट्विट? 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा कसिनोमधील एक कथित फोटो शेअर केला आहे. राऊत यांनी फोटो ट्विट करत जुगार खेळल्याचे आरोप केले, 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?  “महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…” या ट्विटमुळे आता राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत.

(हेही वाचा Indian Air Force: भारतीय हवाई दलाकडून अज्ञात वस्तूच्या शोधासाठी २ राफेल लढाऊ विमाने पाठवली, वाचा पुढे काय झालं…)

भाजपने काय केले ट्विट? 

आता भाजपनेही आमदार आदित्य ठाकरे यांचा फोटो ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने आता आदित्य ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोत आदित्य ठाकरे यांच्या हातात ग्लास आहे. भाजपने ट्विटमध्ये लिहिले की, “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्यच्या या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की?

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे, असं स्पष्ट करत बावनकुळेंनी राऊतांच्या आरोपांचे खंडन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.