CM Siddaramaiah यांच्यावर ईडीची कारवाई; भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले, मोठा भ्रष्टाचार…

57
CM Siddaramaiah यांच्यावर ईडीची कारवाई; भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले, मोठा भ्रष्टाचार...
CM Siddaramaiah यांच्यावर ईडीची कारवाई; भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले, मोठा भ्रष्टाचार...

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. आता या प्रकरणावर, कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र (B. Y. Vijayendra) यांनी या कारवाईला ‘मोठा विजय’ म्हटले आहे. ईडीच्या चौकशीत मुख्यमंत्र्यांशी संबंधित ‘मोठा भ्रष्टाचार’ उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य – CM Devendra Fadnavis

यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) केलेल्या पोस्टमध्ये विजयेंद्र (B. Y. Vijayendra) म्हणाले की, मुडा घोटाळ्याविरुद्धच्या (Muda Scam) आमच्या लढाईत मोठा विजय झालाय. ईडीच्या तपासात मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्याशी संबंधित मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून आपल्या पत्नीच्या नावावर बेकायदेशीरपणे जागा वाटप केल्याचा आरोप आहे. प्रभावशाली व्यक्तींच्या बेनामी आणि बनावटी लोकांना जागा वाटप केल्याने पद्धतशीर भ्रष्टाचार उघडकीस येतो. राज्यपालांच्या संवैधानिक अधिकारांना कमकुवत केल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवरही (Congress) टीका केली.

जेव्हा महामहिम राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी दिली, तेव्हा काँग्रेस पक्षाने राज्यपालांच्या संवैधानिक अधिकाराचा अपमान आणि अवमान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कर्नाटक उच्च न्यायालयानेही राज्यपालांचा निर्णय कायम ठेवला होता आणि मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबावरील आरोपांची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले होते.

तसेच विजयेंद्र (B. Y. Vijayendra) म्हणाले की, भाजप (BJP) आणि जेडीएसने मुख्यमंत्री आणि त्यांच्या समर्थकांकडून सत्तेच्या या “दुरुपयोगा” विरोधात विधानसभेच्या आत आणि बाहेर सतत निषेध नोंदवल्याचे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी म्हंटले आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांची 300 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने शुक्रवारी ही माहिती दिली.ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आल्याचे तपास यंत्रणेने सांगितले. याअंतर्गत या लोकांच्या 142 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘जप्त केलेली मालमत्ता वेगवेगळ्या लोकांच्या नावावर नोंदवण्यात आली आहे. हे लोक रिअल इस्टेट व्यावसायिक आणि एजंट म्हणून काम करत आहेत.

वास्तविक, अनेकांना कमी किमतीत अनेक मालमत्ता दिल्याचा मुडा वर आरोप आहे. यामध्ये म्हैसूरमधील पॉश भागात सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांना दिलेल्या 14 साइट्सचाही समावेश आहे. म्हैसूरमधील कसाबा होबळी येथील कसारे गावातील त्याच्या 3.16 एकर जमिनीच्या बदल्यात ही जागा देण्यात आली होती. 14 जागा 3 लाख 24 हजार 700 रुपयांना देण्यात आल्या. मात्र, या 3.16 एकर जमिनीवर पार्वती यांचा कोणताही कायदेशीर हक्क नव्हता. ही जमीन पार्वती यांचा भाऊ मल्लिकार्जुन यांना 2010 मध्ये भेट म्हणून देण्यात आली होती. ही जमीन संपादित न करता मुडाने देवनूर स्टेज 3 लेआउट विकसित केला होता. (CM Siddaramaiah)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.