‘महाराष्ट्र बंद’च्या दिवशी भाजपाने शिवसेनेला करून दिली ‘ही’ आठवण!

तथाकथित 'बंदसम्राटांचा' पुन्हा आज इतिहास आठवा...मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केले, अशी टीका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली.

लखीमपूर येथील हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबर रोजी जो महाराष्ट्र बंद पुकारला, त्याला मनसे आणि भाषणेही विरोध केला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी तर ‘मावळ येथे शेकऱ्यांवर गोळीबार झाला होता, तेव्हा उत्तर प्रदेश बंद झाला होता का, असा सवाल विचारला, तर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या ‘बंद’च्या इतिहासाची आठवण ट्विटद्वारे करून दिली.

गिरणीच्या संपाला दिलेला छुपा पाठिंबा! 

बंद आणि विरोध यांचा “धंदा”, गोळा होतो त्यावरच “चंदा”! बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित “बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा…मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले, असा आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला.

सत्तेत आल्यावर मुंबईकरांना धरले वेठीस

एवढेच कशाला, आता सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय…कोस्टल रोडला विरोध…नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध…मेट्रोचेही हे विरोधकच…हे तर विकासातील गतीरोधक! बंद आणि विरोध यांचा “धंदा” गोळा होतो त्यावरच “चंदा”!

आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद, ही तर तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी”चाल, आई  दुर्गामाते जनतेला दे “बळ”!, उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा “खेळ”!, असेही शेलार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here