लातूरला भाजपने पाणी पोहोचवले, बिल मात्र ठाकरे सरकारने भरले- गुलाबराव!

ट्रेन आणि टँकर ने पोहचवलेल्या पाण्याचे बिल महाविकास आघाडीने भरले असल्याचा टोमणा, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने लातूर पर्यंत ट्रेनने पिण्याचे पाणी पोहचवून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ट्रेन आणि टँकर ने पोहचवलेल्या पाण्याचे बिल महाविकास आघाडीने भरले, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सभागृहात सांगितले.

गुलाबरावांचा टोला

मराठवाड्यात २०१६ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. यावेळी नागरिक तसेच जनावरांना देखील पिण्याचे पाणी मिळत नव्हते, अशी परिस्थिती असताना यावेळी राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने लातूर पर्यंत ट्रेनने पिण्याचे पाणी पोहचवून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ट्रेन आणि टँकर ने पोहचवलेल्या पाण्याचे बिल महाविकास आघाडीने भरले असल्याचा टोमणा, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी विचारलेल्या उप प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा टोला लगावला.

वॉटर ग्रीड प्रकल्प बंद होणार नाही

मराठवाड्यातील दुष्काळ कायमस्वरुपी सोडवण्यासाठी भाजप सरकारने “वॉटर ग्रीड” प्रकल्प सुरू केला होता. मात्र हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपकडून केला गेला. यासंबंधी विधानसभेत माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून प्रश्न विचारला गेला. त्याला उत्तर देताना हा प्रकल्प बंद करण्याचे पाप महाविकास आघाडी सरकार करणार नाही. मराठवाडा नेहमीच दुष्काळाच्या विळख्यात अडकलेला असतो. त्यामुळे महाराठवाड्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी, हा महत्वाचा प्रकल्प भाजप सरकारने सुरू केला आहे. त्याचे महत्व ओळखून हा प्रकल्प कदापि बंद केला जाणार नाही. ह्या प्रकल्पामुळे मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सध्या कोरोनाचा काळ आहे, त्यामुळे ह्या प्रकल्पाला थोडा उशीर होत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच, प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू केलं जाणार असल्याची माहिती, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच मराठवाड्यात असलेल्या धरणाची बाकी राहिलेली कामे देखील लवकरच सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here