अजित पवार, अनिल परबांच्या सीबीआय चौकशीची अमित शहांकडे मागणी

प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शहा यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

85

भाजपने नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये १०० कोटी वसुलीच्या आरोपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब या दोघांची सीबीआय चौकशी करावी, असा ठराव संमत केला होता. त्याप्रमाणे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले आहे.

(हेही वाचाः विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार? राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल)

भाजपच्या कार्यकारिणीत मंजूर झालेला ठराव 

पमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करा, असे चंद्रकांत पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. सचिन वाझेच्या पत्रातील उल्लेखाच्या आधारे ठाकरे सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करा, अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत गुरुवारी, २४ जून रोजी करण्यात आली होती. जनतेला जेरीस आणलेल्या या सरकारने गुन्हेगारांना मात्र सुरक्षा कवच पुरवले आहे. वाझे प्रकरण, गृहमंत्र्यांचे खंडणी वसुली प्रकरण, पोलिस खात्यातील बदली भ्रष्टाचार अशा अनेक प्रकरणामुळे ठाकरे सरकारची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे. सचिन वाझे यांच्या पत्रातील उल्लेखाच्या आधारे अनिल देशमुख यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, असे भाजपच्या कार्यकारिणीच्या राजकीय ठरावात म्हटले होते.

(हेही वाचाः अधिवेशनाच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडी, शिवसेना आमदारांना व्हिप जारी)

भाजपच्या डावपेचाला कुणीही घाबरत नाही! – नवाब मलिक

भाजप ठरवणार…भाजप मागणी करणार…भाजपची लोक निर्णय घेणार… भाजपची लोक लोकांना अटक करणार…लोकांना दंड ठोठावणार…ही लोकशाही आहे का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. आम्ही बोलू तोच कायदा…आम्ही बोलू तेच होणार इतकी लोकशाहीची थट्टा होऊ शकत नाही, अशा शब्दात नवाब मलिक यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भाजपने देशात ज्याप्रकारची परिस्थिती म्हणजे भयाचे वातावरण निर्माण करायचं…लोकांवर राजकीय दबाव आणायचा परंतु त्यांची बंगाल मॉडेल फेल ठरले आहे हे लक्षात ठेवावे, असेही नवाब मलिक यांनी सुनावले आहे. महाराष्ट्रातही बंगाल मॉडेल करायची भाजपची इच्छा असेल तर करावे. भाजपच्या डावपेचाला महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही, हे लक्षात ठेवावे, असा स्पष्ट इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.