शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे संशोधन व साहित्य यांचे कलादालन छत्रपती शिवाजी महाराज उद्याना (शिवाजी पार्क) संयुक्त महाराष्ट्र कलादालनात उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. भावी पिढ्यांसमोर शिवशाहीर बाबासाहेबांचा जीवनपट आणणे हीच खरी शिवशाहिरांना आदरांजली ठरेल, असे शिंदे म्हणाले.
महापौर किशोरी पेडणेकर यांना विनंती
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी घराघरात पोहोचवला त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे दु:खद निधन झाले. शिवशाहीर जरी आपल्यातून निघून गेले असले, तरी त्यांनी केलेले विपूल लेखन, साहित्य आणि ऐतिहासिक संशोधन हे पुढच्या पिढीला उपलब्ध करुन देणे. त्यांचा जीवनपट त्या निमित्ताने भावी पिढ्यांसमोर आणणे हीच त्यांना खरी आादरांजली ठरेल आणि भारतीय पक्षाचा गटनेता म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना अतिशय नम्र विनंती करतो की, शिवाजी पार्कसमोरील संयुक्त महाराष्ट्र कलादालन ज्या ठिकाणी आहे, त्याच्या पहिल्या माळ्यावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कलादालन उभे करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.
(हेही वाचा : हुतात्मा स्मारकाची साठ वर्षे पूर्ण! काय आहे इतिहास? )
Join Our WhatsApp Community