गणेश आगमन -विसर्जन मार्गावर खड्डेच… तातडीने खड्डे बुजवण्याची भाजपची मागणी

167

मुंबई शहर आणि उपनगरातील गणपती विसर्जनाच्या मार्गावरील खड्ड्यांबाबत भाजपने महापालिका आयुक्त तथा प्रशासकांना रस्त्यांची यादीच सादर करत त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. श्री गणरायाचे आगमन दोन दिवसांवर असताना महापालिकेने गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने मिरवणुका निघणाऱ्या प्रमुख मार्गांची यादीच आयुक्तांना सादर करत या रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.

( हेही वाचा : लालबागच्या राजाची पहिली झलक)

श्रीगणेशाचे आगमन दोन दिवसांवर येवून ठेपले आहे आणि ९ सप्टेंबर २०२२ रोजी गणेश विसर्जन आहे. अशावेळी मुंबईतील सर्व रस्ते खड्डे मुक्त करणे आवश्यक आहे. याबाबत भारतीय जनता पक्ष नगरसेवक गटातर्फे केलेल्या पाहणीनुसार सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही खालील ठिकाणी अद्याप खड्डे भरण्यात आलेले नाहीत,असा आरोप भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी आपल्या निवेदनात केला आहे. या निवेदनामध्ये भाजपने काही रस्त्यांची यादी दिली आहे, त्यामध्ये १२ ते १३ प्रभागांमधील गणेश आगमन आणि विसर्जन मार्गाच्या प्रमुख रस्त्यांची यादीच सादर केली आहे. या व्यतिरिक्तही मुंबई शहरातील अनेक रस्त्यांवर अद्याप खड्डे भरण्याचे काम पूर्ण झालेले नाही. तरी आपण यात जातीने लक्ष घालून तातडीने मुंबई शहरातील खड्डे बुजवावेत अशी मागणी शिंदे यांनी या निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे या व्यतिरिक्तही मुंबई शहरातील अनेक रस्त्यांवर अद्याप खड्डे भरण्याचे काम पूर्ण झालेले नाही. तरी आपण यात जातीने लक्ष घालून तातडीने मुंबई शहरातील खड्डे बुजवावेत,अशी मागणी केली आहे.

भाजपने सादर केलेल्या रस्त्यांची यादी अशाप्रकारे आहे…

  • के ईस्ट – वार्ड क्र. ८४ बाजीप्रभू देशपांडे मार्ग, तेजपाल स्कीम रोड क्र. २, पांडलोसकर मार्ग
  • के वेस्ट – वार्ड क्र. ७१ अॅनी बेझंट रोड जैन मंदिराजवळ, सेंट फ्रान्सिस रोड.
  • एच – वेस्ट वार्ड क्र. ९८ रोड नं १७ व रोड क्र. १९.
  • दहिसर वार्ड क्र. २ राम कुवर ठाकूर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स जवळ रोड क्र. ४.
  • एल – वार्ड क्र. १६४ फिनिक्स मॉलच्या बाजुला, साकीनाका, नेताजी नगर, ९० फुट रस्ता, सुंदर बाग.
  • एम – पश्चिम वार्ड क्र. १४९ टिळक नगर पेस्तम सागर रोड क्र. ३ व रोड क्र. ५.
  • आर सेन्ट्रल – वार्ड क्र. २०, २१, ३१ नवीन लिंक रोड, चारकोप मार्वे लिंक रोड.
  • एस – वार्ड भांडूप वार्ड क्र. १११ नाहूर रेल्वे स्टेशन पूर्व ते सेनरुफ इमारती पासून मुलुंड गोरेगाव लिंक रोड जोडणारा मार्ग, भांडूप पोस्ट ऑफिस ते राम नगर कलावती आई मार्ग.
  • एन – वार्ड क्र. १२५ नायडू कॉलनी अंतर्गत महापालिकेचे रस्ते
  • वार्ड क्र. १३१ पंतनगर गुरुदत्त मंदिर मार्ग, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.