बेस्ट बसमध्येही ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना एसटी प्रमाणे मोफत प्रवास देण्याची भाजपची मागणी

145

राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्याचधर्तीवर मुंबईतील बेस्ट प्रवासांमध्ये ज्येष्ठांना मोफत प्रवासांची सवलत देण्याची मागणी भाजपने केली आहे.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ही मागणी करत मुंबईतील ज्येष्ठांना दिलासा देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

( हेही वाचा : गणेश आगमन -विसर्जन मार्गावर खड्डेच… तातडीने खड्डे बुजवण्याची भाजपची मागणी )

बेस्टचे माजी अध्यक्ष असलेल्या भाजपचे माजी नगरसेवक प्रविण छेडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. छेडा यांनी या निवेदनामध्ये ज्याप्रकारे एसटीच्या सर्व प्रकारच्या प्रवासात ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत दिली आहे,त्याच धर्तीवर ही सवलत देण्याची मागणी केली आहे. एसटीच्या धोरणाप्रमाणे ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना बेस्ट बसमध्ये मोफत बस प्रवासाची सवलत देतानाच मुंबई शहर व उपनगरांमधील ६५ वर्ष ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५० टक्के प्रवास सवलत मिळावी अशीही मागणी केली आहे. बेस्ट सेवेत मुबलकता मिळावी याकरता सहकार्य मिळावे अशीही मागणी त्यांनी केली.

कोरोना काळात थांबवलेली शालेय बस सेवा पूर्ववत करा

मुंबईत कोरोना काळामध्ये शालेय बस सेवा बंद केली असून या सर्व शालेय बसेसच्या सेवा पूर्वव्रत करण्याची मागणी बेस्टचे माजी अध्यक्ष प्रविण छेडा यांनी महाव्यवस्थापकांकडे केली आहे. शालेय विद्यार्थ्यांकरता सुमारे ५०० जास्त फेऱ्या आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून दिल्या जात होत्या. कोविड काळात सुरु केलेल्या या बस सेवा फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या आणि आताही बेस्ट उपक्रम या सेवा सुरु करणार नाही,असे म्हटले आहे. परंतु वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे लागणारा जिकरीचा प्रवास हा पालकांच्या चिंतेचा विषय असून या गैरप्रकार टाळण्यासाठी शालेय बस सेवा पूर्वव्रत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.