भाजपचे मंदिरांसाठी आंदोलन!

राज्यातील सर्व मंदिरे लवकरात लवकर उघडण्याची ठाकरे सरकारला सदबुद्धी मिळावी याकरिता शिवलिंगाचा अभिषेक व आरती करुन त्र्यंबकराजाला साकडे घालण्यात आले.

 

राज्यात ठाकरे सरकारने अनेक महिन्यांपासून मंदिरे बंद करुन ठेवली आहेत. श्रावण महिना सुरु झाला तरी मंदिरे उघडण्यात आली नाहीत. म्हणून राज्य सरकारविरोधात भाजप आध्यात्मिक आघाडीतर्फे पहिल्या श्रावणी सोमवारी आद्यज्योतिर्लिंग श्रीत्र्यंबकेश्वर मंदिरासमोर भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात साधु-महंतांसह भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी राज्यातील सर्व मंदिरे लवकरात लवकर उघडण्याची ठाकरे सरकारला सदबुद्धी मिळावी याकरिता शिवलिंगाचा अभिषेक व आरती करुन त्र्यंबकराजाला साकडे घालण्यात आले. यावेळी आखाडा परिषदेचे महंत शंकरानंद सरस्वती, रामानंद महाराज, प्रकाश महाराज जवंजाळ आदिंसह साधु-महंत तसेच त्र्यंबकेश्वर भाजप तालुकाध्यक्ष विष्णु दोबाडे, शहराध्यक्ष सुयोग वाडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

(हेही वाचा : होय, ती माझी चूकच होती! वीर सावरकरांवरील वक्तव्यावर नितेश राणेंची कबुली)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here