राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. सलग तिसऱ्या दिवशीही विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होताना दिसतेय. अशातच भाजपकडून या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सभागृहात अनेक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. त्यामुळे लोकशाहीचे रक्षक असाल तर राज्याचं अधिवेशन एका आठवड्याने वाढवलं पाहिजे. त्यामुळे हे खरे लोकशाहीचे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि जर लोकशाहीचे भक्षक असतील तर ते अधिवेशनाचा कालावधी वाढवणार नाहीत, असे मुनगंटीवार म्हणाले.
‘राज्याचं अर्थचक्र थांबलं असून कोमात गेलं’
माध्यमांशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्यांसाठी वाढवला पाहिजे. कारण आमच्याकडे भरपूर कामकाज आहे. या सभागृहाला योग्य आणि समर्पक न्याय द्यायचा असेल तर एक आठवडा हे अधिवेशन वाढवलंच पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते पुढे असेही म्हणाले की, राज्याचं अर्थचक्र थांबलं आहे आणि कोमात गेलं आहे. राज्यामध्ये अनेक रोजंदारी कामगारांचे पैसे दिलेले नाहीत. धानाचा बोनस दिलेला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न उर्वरीत आहेत. कोरोनाच्या कालावधीत झालेला भ्रष्टाचार, आरोग्य सेवेसह मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. तर मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडत आहेत. इतके विषय शेतकरी, कामगार, बेरोजगारी, कष्टकरी, विद्यार्थ्यी बेरोजगार पेपर फुटीसारखं घाणेरडं कृत्य आणि पाप या राज्यात होत असल्याने नागरिकांच्या मनात संताप आहे.
(हेही वाचा – ठरलं! विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर, कोण होणार नवा अध्यक्ष?)
कमी वेळात अधिवेशन उरकणं हे लोकशाहीला धरुन नाही
विधिमंडळाचं अधिवेशन कमी वेळात उरकणं हे लोकशाहीला धरुन नाही. लोकशाहीची पायमल्ली करण्याचंच त्यांनी ठरवलं आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला फक्त ३२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करण्याची इच्छा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आज सभागृहात पेपर फुटीवरुन आक्रमक भूमिका घेणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे काय करणार आहेत. पेपर फुटीच्या विषयामध्ये काय चौकशी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विम्या विषयी काय करणार, नुकसान भरपाई, खोटी बिले आल्यामुळे वीज खंडीत करण्यात येत आहे ते थांबवणार का? कशाचे उत्तर आले नाही. त्यामुळे अजून काही दिवस हे अधिवेशन वाढवले पाहिजे असा आग्रह करणार आहोत.
Join Our WhatsApp Community