ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारविरोधात लढा तीव्र करणार, असा एल्गार करत ओबीसी आरक्षण जाणे हे या सरकारचं पाप आहे. हे षडयंत्र आहे. त्यांच्या मनात पाप होतं म्हणून ओबीसी आरक्षण यांनी घालवले, असे म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
(हेही वाचा – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीमध्येच, ईडीच्या तपासात भाच्याचा खुलासा)
काय म्हणाले फडणवीस…
तसेच राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षणाची हत्या करण्यात आली, अहवाल तयार करण्यात अपयशी ठरल्याने ओबीसी आरक्षण रखडले, याचे रिपोर्ट तयार करण्यासाठी कोणीही तयार नसल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच, ठाकरे सरकार फक्त झोपा काढतंय आणि टाईम पास करतंय. जाणीवपूर्वक हे आरक्षण ठाकरे सरकारने रखडवल्याचा आरोप भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत फडणवीस यांनी केला आहे.
यावेळी ठाकरे सरकारने व्हॅटमध्ये जी कपात केली ती फसवी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. हा आरोप करताना ते म्हणाले, राज्य सरकारने मे महिन्यात एप्रिल-फूल केले. इंधनाच्या केंद्राच्या करापेक्षा राज्याचा तर अधिक आहे. इंधनाच्या करावरून ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करणार, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे. महागाई कोणामुळे वाढली, राज्य सरकार कांदा उत्पादकांसाठी काय करतंय असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार, नाना पटोलेंना फडणवीसांनी सवाल उपस्थित केले आहे.