राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई-ठाणे या शहरांतून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर मुंबईकडे पैसेच उरणार नाही, मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान मुंबईतील एका कार्यक्रमात केल्यावर राज्यपालांच्या या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंक्षी देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
( हेही वाचा : वादग्रस्त वक्तव्यानंतर अखेर राज्यपालांनी दिलं स्पष्टीकरण! म्हणाले… )
त्यांच्याही मनात मराठी माणसांबद्दल श्रद्धा आहे
राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचे कार्य आणि श्रेय सर्वाधिक आहे. उद्योगाच्या श्रेत्रात सुद्धा मराठी माणसाने जी प्रगती केली आहे यामुळे जगभरात मराठी माणसाचे नाव आहे. हे खरंच आहे महाराष्ट्रात विविध समाज आहे परंतु महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी साहित्यिक, उद्योजक, विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यावर अनेकवेळा अतिशयोक्ती अलंकार वापरले जातात तशाचप्रकारे राज्यपालांनी वक्तव्य केले त्यांच्याही मनात मराठी माणसांबद्दल श्रद्धा आहे त्यांनाही पूर्णपणे याची जाणीव आहे की, मुंबईच्या विकासात मराठी माणसाचा सर्वाधिक हातभार आहे. आम्ही त्यांच्या विधानाशी सहमत नाही असे देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे.
शेलारांचे ट्वीट
राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये असे ट्वीट आशिष शेलारांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community