पवारांच्या घरावरील हल्ल्यास भाजपाला जबाबदार धरणारे अल्पबुद्धीचे!  

137

एसटीच्या कामगारांनी दोन दिवसांपूर्वी थेट मुंबईतील शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर हल्ला केला. या या हल्लामागे भाजप जबाबदार आहे, असा आरोप सर्वात आधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता, त्यावर भाजप नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचे नाव न घेता असा आरोप केला.

आम्ही आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत होतो. सातत्याने त्यांची मागणी लावून धरली होती. पण सरकारने आडमुठी भूमिका घेतली. ५ महिने हा संप चिघळवत ठेवला. कर्मचाऱ्यांचा हा उद्रेक आजही आपल्याला पाहायला मिळतोय. पण शरद पवारांच्या घरी घडलेली घटना चुकीची होती. तिचा आम्ही निषेधच करतो, या हल्ल्यामागे भाजपला जबाबदार धरणारे अल्पबुद्धीचे आहे, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा ‘उत्तरसभे’आधी वसंत मोरे राजकीय भूमिका ठरवणार!)

हनुमान चालीसावर राग का येतो? 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या पाडवा मेळाव्यामध्ये मशिदींवरील भोंगे न हटवल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. यानंतर खुद्द मनसेमधूनच पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांनी या भूमिकेच्या विरोधी भूमिका घेतल्यानंतर देखील मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जोरकसपणे या भूमिकेचे समर्थन केले आहे. यासंदर्भात कोल्हापुरात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हनुमान चालीसा ही आपल्या देशाची एक परंपरा आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने काही लोकांना इतका राग का येतो? हा सवाल त्यांना कधीतरी विचारा. भोंगे वाजल्याने राग येत नसेल, तर हनुमान चालीसानेही राग यायला नको, असे फडणवीस म्हणाले.

शिवसेना छद्मधर्मनिरपेक्षवादी 

दरम्यान, शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याच्या मुद्द्यावरून देखील देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला. ज्या वेळी शिवसेनेनच्या विभाग प्रमुखाने उर्दूमध्ये कॅलेंडर काढून जनाब बाळासाहेब ठाकरे असे नाव छापले, त्यावेळी हिंदूत्ववादी असलेली शिवसेना ही छद्मधर्मनिरपेक्षवादी झाली. आमचा कुठल्याही धर्माला विरोध नाही. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण लांगुलचालनाला आमचा विरोध आहे. शिवसेनेचे नेते अजान स्पर्धा जर भरवत असतील, तर हे प्रश्न निर्माण होणारच, असे फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.