विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अनेकदा ट्विटरवरून महाविकास आघाडीवर वारंवर हल्लाबोल करत असतात. मात्र टीका करण्याचा आणि आरोप करण्याचा पत्नी-पत्नीचा योग चांगलाच जळून आल्याचे समोर आले आहे. गुरूवारच्या विधानसभेतील भाषणात देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या आरोपांचे पाढे वाचले यानंतर त्यांच्या पत्नी देखील महाविकास आघाडीवर बरसल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी म्हणजे खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवाली की रक्षा करुंगा, अशी खोचक टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे.
अमृता फडणवीसांची खोचक टीका
अमृता फडणवीस महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाल्या, महाराष्ट्राची आज जी परिस्थिती आहे ती ‘खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खाने वालों को सुरक्षा भी दूंगा’ अशी आहे. हे बंद झालं पाहिजे. राज्यात प्रगतीचे राजकारण झालं पाहिजे. बाकी तुम्ही खाण्यात काही खा किंवा न खा, त्याने काही फरक पडत नाही. कोणत्याही द्वेषापोटी कारवाई नाही, तर महाराष्ट्रात प्रगतीचं राजकारण करावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
(हेही वाचा – मला ठार मारण्याचा सरकारचा कट होता! नितेश राणेंचा गौप्यस्फोट )
महाराष्ट्रात विकासाचे राजकारण हवं
नागरिकांना महाराष्ट्रात विकासाचे राजकारण हवं आहे. भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणा कुठेही सूड भावनेने कारवाई करत नाही. जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतात तेव्हा त्यांच्याकडे पुरावे असतात. तेव्हाच ते तपास करतात आणि निष्पक्ष पद्धतीनेच त्याचा तपास करतात. त्यामुळे आता आपण बोलून काही उपयोग नाही. या सर्व चौकशांचा अंतिम निष्कर्ष समोर आल्यावर कळेलच, असेही पुढे अमृता फडणवीस म्हणाले.
फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. त्यांचा फायनान्सियल रिसोर्स मॅनेजमेंटचा आकडा 45 वर आहे. आपल्यापुढे नवी मुंबई, पुणे, नागपूरसुद्धा आहे. कशाप्रकारे महापालिकेचे बजेट लुटून नेण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे. असे म्हणत फडणवीसांनी मविआवर जोरदार हल्लाबोल केला.
Join Our WhatsApp Community