BJP : काका-पुतण्यांच्या एकजुटीसाठी भाजपचे प्रयत्न

184
BJP : काका-पुतण्यांच्या एकजुटीसाठी भाजपचे प्रयत्न
BJP : काका-पुतण्यांच्या एकजुटीसाठी भाजपचे प्रयत्न

वंदना बर्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान यांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चेमुळे काका गाल फुगवून बसले आहेत. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस चिराग पासवान यांचे काका आहेत. लोकसभेचे निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे देशातील राजकीय वातावरण बदलत आहे. देशाला विकासाच्या वाटेवर कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने रालोआतील घटक पक्षांना जोडून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी सत्ताधारी पक्षाने मित्र पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची सुध्दा तयारी केली आहे.

परंतु, केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान या काका-पुतण्याच्या भांडणाने भाजपचे टेंशन वाढविले आहे. एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची संख्या वाढवित आहेत तर दुसरीकडे पासवान काका-पुतण्यांनीही त्यात भर घातली आहे. पशुपती कुमार पारस आणि चिराग पासवान यांनी बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. दोन्ही नेते हाजीपूरची जागा सोडायला तयार नाहीत. एवढेच नव्हे तर, चिराग पासवान यांनी हाजीपूरशिवाय लोकसभेच्या पाच आणि राज्यसभेची एक जागा मागितली आहे.

(हेही वाचा – सात वर्षानंतरही मुंबईतील वृद्धांसाठी नाही उभारले डे केअर सेंटर)

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एलजेपीला एनडीएमध्ये सहा जागा मिळाल्या होत्या आणि त्यांचे सर्व उमेदवार निवडून आले होते. मात्र, पुढे चालून लोजपात फूट पडली आणि पारस यांच्यासोबत चार खासदार गेलेत. चिराग पासवान हे आता त्यांच्या पक्षाचे एकमेव खासदार आहेत. बिहारच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत काका-पुतणे आणि भाजप एकमेकांची गरज आहे. काका-पुतणे वेगळे लढावेत आणि पासवान यांची मते फुटावीत, असे भाजपला वाटत नाही, कारण भाजपसाठी जेवढे उपेंद्र कुशवाह आणि जितनराम मांझी महत्त्वाचे आहेत, तेवढेच पारस-चिरागही आहेत. चिराग पासवान यांनी खगरिया, जमुई आणि समस्तीपूर या जागांची भाजपशी अदलाबदल करण्याची तयारी दर्शविली आहे. माजी खासदार अरुण कुमार यांच्यासाठी जहानाबादची जागा सोडण्याची मागणी त्यांनी भाजपकडे केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.