BJP चा सावध पवित्रा; मुख्यमंत्री कोण?

163
BJP चा सावध पवित्रा; मुख्यमंत्री कोण?
  • सुजित महामुलकर

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपाने सावध पवित्रा घेत २०१९ प्रमाणे मुख्यमंत्रीपदाचा चेहेरा उघड न करता गुलदस्त्यात ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (BJP)

दिल्लीतील बैठकीत काय झाले?

राज्यातील भाजपाच्या कोअर कमिटीच्या नेत्यांनी मंगळवारी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याचा विषय तसेच आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणती काळजी घ्यावी, यासह अन्य विषयांवर चर्चा झाली. (BJP)

गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस यांचा चेहेरा होता

२०१९ मध्ये भाजपा आणि शिवसेना युतीमध्ये विधानसभा निवडणूक लढवली गेली आणि मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा चेहेरा भाजपाने जनतेपुढे ठेवला होता. तेव्हा युतीला पूर्ण बहुमत मिळूनही शिवसेनेने अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा पुढे करत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तसेच अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद देण्याचा ‘शब्द पाळला नाही’ असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. (BJP)

(हेही वाचा – NCP : अजितदादांची राष्ट्रवादी परफॉर्मन्समध्ये झिरो; तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपालाच इशारा!)

मुख्यमंत्रीपदासाठी आता तीन पक्षांत स्पर्धा

दरम्यान २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली आणि ४० आमदार घेत एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यांनी नैसर्गिक युती असलेल्या भाजपाला पाठिंबा दिला तर भाजपाने १०५ आमदार असतानाही शिंदे यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालत एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवले. त्यानंतर वर्षभरातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडलं आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार बाहेर पडत महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आता तीन पक्षांत स्पर्धा तयार झाली असून प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्रीपदी बसावा अशी अपेक्षा आहे. (BJP)

नावामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो

आता चार महिन्यात विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाताना भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) असे तीन मोठे पक्ष असल्याने अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर झाल्यास अन्य दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. तसेच त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्रीपदाचा चेहेरा गुलदस्त्यात ठेवण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. (BJP)

मुख्यमंत्री कोण? निर्णय वरिष्ठ नेते घेतील

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तसे संकेत दिले. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजित पवार आहेत. महायुतीत मुख्यमंत्री कोण असेल? यावर आज चर्चा झाली नाही. पण देवेंद्र फडणवीस आमचे भाजपाचे नेते आहेत. आज मुख्यमंत्रीपदाची चर्चा करण्याची गरज नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल? याचा विचार करण्यापेक्षा महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या विकासाकरिता काम करण्याची गरज आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाचे वरिष्ठ नेते, प्रभारी एकनाथ शिंदे बसून निर्णय घेतील,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (BJP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.