विधानसभा निवडणुकीत भाजपाला (BJP) सर्वात जास्त चिंतेचा विषय बनला आहे तो बंडखोरांचा. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरले असताना एकाही बंडखोराने अर्ज मागे घेण्याविषयी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे अखेर दिल्लीतील आदेशावरून राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना बंडखोरी शमवण्याचे आदेश दिले आहे. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
(हेही वाचा Sada Sarvankar: “…तर मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार”, सदा सरवणकरांची अट काय?)
दिल्लीतील नेत्यांनी राज्याच्या नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी शमवा असे सांगितले आहे. त्याकरता प्रसंगी बंडखोरांच्या नातेवाईकांची मदत घेण्यास सांगितले आहे. भाजपाच्या (BJP) बंडखोरांमध्ये सर्वाधिक संघाचे कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षांपासून आम्ही काम करत असूनही आम्हाला संधी का दिली जात नाही, त्यामुळे काहीही झाले तरी आम्ही अर्ज मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. भाजपाला लोकसभा निवडणुकीत आणि इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक फटका बंडखोरांचा बसला आहे. त्यामुळे राज्यातील भाजपा नेत्यांची झोप उडाली आहे.
सहा वर्षांसाठी पक्षातून करणार निलंबन
९० टक्क्यांपेक्षा जास्त बंडखोर उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. मात्र जे उमेदवारी अर्ज परत घेणार नाही, त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले जाईल. पुढील सहा वर्ष त्यांच्यासाठी पक्षाचे दारे बंद राहतील आणि कितीही प्रयत्न केले तरी निलंबन मागे होणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. (BJP)
Join Our WhatsApp Community