चित्रा वाघ बनल्या राष्ट्रीय नेत्या! ‘ही’ मिळाली जबाबदारी!

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकारिणीसाठी निमंत्रित आणि स्थायी निमंत्रित पदांवर नियुक्त्या केल्याचे जाहीर केले. या यादीत एकूण १८ जणांनी नावे असून महाराष्ट्रातून २ महिला नेत्यांना संधी देण्यात आली आहे.

134

महिलांवरील अत्याचारांविरोधात आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रातील काही बड्या नेत्यांना अडचणीत आणले होते. त्याच बरोबर त्यांनी राज्यात घडलेल्या विविध महिला अत्याचारांच्या प्रकरणांचा पाठपुरावा केला. त्यामुळे चित्रा वाघ यांची भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली आहे. भाजपाने चित्रा वाघ यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतले आहे.

भाजपाची ८० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकारिणीसाठी निमंत्रित आणि स्थायी निमंत्रित पदांवर नियुक्त्या केल्याचे जाहीर केले. या यादीत एकूण १८ जणांनी नावे असून महाराष्ट्रातून २ महिला नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंना यापूर्वीच राष्ट्रीय कार्याकारिणीत घेण्यात आले आहे. आता, चित्रा वाघ यांनाही संधी देण्यात आली आहे. भाजपाची ८० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील ८ नेत्यांना संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे, भाजपाकडून चित्रा वाघ यांना बढती मिळाल्याचे दिसून येते.

(हेही वाचा : अजित पवारांच्या नातेवाईकांवर धाड! काय म्हणाले दादा? वाचा…)

चित्रा वाघ यांचे सत्ताधिऱ्यांना थेट भिडण्याचे धाडस

तसेच, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर यांचा पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला आहे. चित्रा वाघ ह्या गेल्या काही महिन्यांपासून भाजपामध्ये सर्वाधिक आक्रमक महिला नेत्या असल्याचे दिसून येते. सत्ताधिऱ्यांना थेट भिडण्याचे धाडस त्यांनी दाखवले आहे. आदिवासी मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील प्रकरणात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यातूनच, राठोड यांना मंत्रीपद सोडावे लागले. तसेच, राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख यांच्यावरील आरोपातही त्या आक्रमकपणे राष्ट्रवादीविरोधात पुढे आल्या होत्या. चित्रा वाघ यांच्या या कार्याची दखल घेऊन, देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीनुसार त्यांची नियुक्ती झाल्याचे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.