BJP vs Thackeray Group : उद्धव ठाकरे गटाला भाजपचा दे धक्का…!

बेस्टच्या दि इलेक्ट्रिक युनियन आणि EPF स्टाफ युनियनच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड

152
BJP vs Thackeray Group : उद्धव ठाकरे गटाला भाजपचा दे धक्का...!
BJP vs Thackeray Group : उद्धव ठाकरे गटाला भाजपचा दे धक्का...!

मागील अनेक वर्षांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ताब्यात असलेल्या व मान्यताप्राप्त असलेल्या बेस्ट कामगार संघटनेच्या दि इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्षपदी, भाजपचे विधान परिषद आमदार आणि श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष प्रसाद लाड यांची शुक्रवारी (२५ ऑगस्ट) एकमताने निवड करण्यात आली.

ही निवड ५००० कामगारांनी केली असून, कित्येक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे असलेली ही युनियन आता आणि आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. श्रमिक उत्कर्ष सभेचा अध्यक्ष या नात्याने कार्यरत असल्याने, हे नेतृत्व मान्य करण्यात आल्याचा दावा आमदार लाड यांनी नंतर भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

(हेही वाचा – Neeraj Chopra : नीरज चोप्रा जागतिक स्पर्धेतच्या अंतिम फेरीत दाखल; ऑलिम्पिकचे तिकीट केले पक्के)

त्याचप्रमाणे आजवर वेगळ्या विचार धारेने काम करणाऱ्या EPF स्टाफ युनियन महाराष्ट्र (रजि.) म्हणजेच भविष्य निधी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देखील आमदार लाड यांच्याकडे सोपविण्यात आली असून, या जबाबदारीच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही आमदार लाड यांनी दिली.

मुंबईतील अनेक कामगार संघटना यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होत्या.परंतु आता हे चित्र बदलताना दिसत असून, बेस्टच्या दि इलेक्ट्रिक युनियनच्या अध्यक्ष पदी आमदार लाड यांची निवड झाल्यामुळे,उद्धव ठाकरे गटाला एकप्रकारे हा धक्का असल्याचे मानले जात आहे.यापूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुहास सामंत यांच्याकडे हे अध्यक्ष पद होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.