रविवारी होणारी म्हाडाकडून विविध पदांच्या भरतीसाठीची परीक्षा मध्यरात्री अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा रद्द करण्यात आल्याचे ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा केले. ट्विटरला व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही माहिती दिली. परंतु म्हाडाची परीक्षा रद्द करण्यात आल्याने भाजप आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत.
‘प्रस्थापितांचे बोलघेवडे…’
यासंदर्भात सरकारला धारेवर धरत गोपीचंद पडळकर यांनी सवाल उपस्थितीत केला आहे. “प्रस्थापितांचे बोलघेवडे जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण खात्याचा दर आठवड्याला एक्सेल शीटमध्ये न चुकता हिशोब घेतात. पण बहुजन पोरांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या म्हाडा नोकरभरतीबाबत लक्ष द्यायला वेळ नाही. आठवड्याभरापासून म्हाडाच्या नोकर भरती परिक्षांमध्ये घोटाळा होणार अस स्वत:च सांगत त्यात बळी पडू नये म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये आवाहन करत होते. जर त्यांना घोटाळ्याची पूर्वकल्पना होती आणि गृहखातेही राष्ट्रवादीकडे असतानासुद्धा त्यांना मध्यरात्री दीड वाजता परीक्षा रद्द का करावी लागली?”
@Awhadspeaks #गृह_निर्माण खात्याचा दर आठवड्याला न चुकता हिशोब ठेवणाऱ्यांना #MHADA भरतीबाबत मात्र लक्ष द्यायला वेळ नाही.जर #घोटाळ्याची पूर्व कल्पना होती, #गृहखातेही #राष्ट्रवादीकडेच आहे तर त्यांना रात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली?
@NCPspeaks @CMOMaharashtra pic.twitter.com/ZtzJimNLN3— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) December 12, 2021
‘त्या बहुजन पोरांविषयी यांना देणंघेणं नाही’
दरम्यान, सरकारवर टीका करताना पडळकर म्हणाले, महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यातच रस आहे एक एक पैसा गोळा करून परिक्षेसाठी पोहचलेल्या बहुजन पोरांविषयी, नोकरीअभावी आत्महत्या करणाऱ्या बहुजन पोरांविषयी यांना काहीही देणंघेणं नाही.
म्हाडाची परीक्षा जानेवारीमध्ये होणार
म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा जानेवारीमध्ये होणार असून राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. यासह जितेंद्र आव्हाड असेही म्हणाले, “सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जानेवारीत घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराबाहेर पडून केंद्रावर जाऊ नये यासाठी इतक्या रात्री ही माहिती देत आहे.”
Join Our WhatsApp Communityम्हाडा च्या पूर्ण आठवड्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे
उद्या परीक्षा होणार नाही pic.twitter.com/ewR8XrWe0G— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 11, 2021