…अन् म्हणतात बारामतीचा विकास झाला, पडळकरांचा पवारांवर हल्लाबोल

83

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामतीला जाताना एका विशेष रस्त्याने पाहुण्यांना घेऊन जातात आणि म्हणतात, बारामतीचा विकास झाला, असा हल्लाबोल भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकरांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पुरंदर येथे ते बोलत होते. यावेळी ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी महाविकास आघाडीवर त्यांनी टीका केली. तसेच शरद पवारांवर देखील निशाणा साधला.

(हेही वाचा – ज्ञानवापी मशिदीच्या वादादरम्यान ‘या’ राज्यात आढळले मशिदीखाली मंदिरं)

काय म्हणाले पडळकर…

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकार त्यावर काहीही करायला तयार नाही. देवेंद्र फडणवीसांसह इतर मंत्र्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरले म्हणून यांनी वीज कनेक्शन तोडणी तात्पुरती थांबवली आहे. परंतु राज्यात लोडशेडिंग सुरूच आहे. तसेच पडळकरांनी ८ तास भारनियमन सुरू असल्याचा आरोप केला. पडळकरांनी पुढे असेही म्हटले की, पुरंदर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातून २२० केबीची लाईन जाते. यामध्ये राष्ट्रवादीचे काही दलाल असून ते सर्वांना पाठीशी घालत असून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. या सर्वांचा विरोध म्हणून आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढत असल्याचे पडळकरांनी सांगितले.

बारामतीचा विकास झाला की नाही, याबद्दल बोलताना पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली आणि ते म्हणाले, पाहुण्यांना दुसऱ्या रस्त्याने घेऊन जात विकास झाला असे म्हणतात. शरद पवारांनी बारामती तालुक्यातील काही गावांना जाणीवपूर्वक पाणी दिले नाही. बारामतीच्या ४२ गावांना पाणी नाही, असे ते म्हणाले. बारामतीतील या पवारांचे ऐकणारे राज्यात असे अनेक प्रांत आहेत. अजित पवार आज सत्तेत आहेत, उद्या नसतील. उद्या फडणवीस सत्तेत आल्यावर तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.