-
प्रतिनिधी
महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या भाजपा सरकारच्या प्रयत्नांना मोठे यश मिळत आहे. पालघर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू करण्यात आलेल्या मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून २७ तरुणांना एसी टेक्निशियन म्हणून नोकरी मिळाली आहे. यापुढील काळात हजारो तरुणांना रोजगार मिळेल, असा ठाम विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी व्यक्त केला.
भाजपा सरकारच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळत आहे. कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे तरुणांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभागाने महाराष्ट्रातील तरुणांसाठी रोजगारनिर्मितीचा नवा मार्ग मोकळा केला आहे.
(हेही वाचा – चीनला काँग्रेसने आपल्या डोक्यावर बसवले; MP Nishikant Dubey यांचा घणाघात)
या कार्यक्रमात मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्यासह अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, सीआयआयचे भारताचे जनरल मॅनेजर सौरभ मिश्रा, मुंबईचे विनायक उक्के, पालघर आयटीआयचे प्राचार्य महेशकुमार सिदम व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) म्हणाले की, भाजपा सरकार रोजगार निर्मितीसाठी कटीबद्ध आहे. राज्यातील युवकांना काळानुरूप प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणे हे आमचे ध्येय आहे. या उपक्रमाद्वारे दहावी, बारावी व पदवीधर तरुणांना प्रशिक्षण देऊन आगामी एक वर्षात २,००० हून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. भाजपा सरकारच्या कार्यकाळात कौशल्य विकासाच्या क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडत असून, महाराष्ट्रातील युवकांना आता रोजगारासाठी दुसऱ्या राज्यांकडे वळावे लागणार नाही, असेही मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी ठामपणे सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community