गोव्यातील भाजपा (BJP) सरकारने १० वर्षांपूर्वी कर्नाटकातील श्रीराम सेनेचे अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते प्रमोद मुतालिक यांच्यावर गोवा प्रवेश बंदी घातली होती. त्यावेळीच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हा निर्णय घेतला होता. सध्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा निर्णय रद्द केला.
(हेही वाचा Bangladeshi Infiltrators : मानवी तस्करी करणाऱ्या दोन बांगलादेशी चोरांना अटक; चोरीसाठी १० वेळा सीमा ओलांडली)
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी 2014 साली मुतालिक यांना गोव्यात प्रवेशास त्यांच्यावर बंदी घातली होती. गोव्यातील प्रवेश बंदी हटवल्यानंतर गोव्यात मुतालिक यांनी भारतमाता की जय संघाचे संस्थापक संघचालक सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी शुक्रवारी मुतालिक यांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी आंतरराष्ट्रीय बजरंग दल, हिंदू रक्षा महाआघाडी आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रमोद मुतालिक हे आपल्या आक्रमक चिथावणीखोर भाषण करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. श्रीराम सेना या त्यांच्या संघटनेने कर्नाटकमध्ये काही आंदोलने केली. प्रमोद मुतालिक यांनी 2014 मध्ये गोव्यात श्रीराम सेनेची शाखा गोव्यात उघडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन भाजपा सरकारचे (BJP) मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी तातडीने त्यांना राज्य बंदी लागू केली होती.
Join Our WhatsApp Community