पूरग्रस्तांसाठी भाजपची अशीही होतेय मदत!

सरकारी मदत, शासकीय पॅकेज याची वाट न पाहता भाजपाच्या तळागळातील कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करीत मदत साहित्य प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबियापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली.

पश्चिम महाराष्ट्र, रायगड, महाड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यावरी निसर्गाचे अस्मानी संकट कोसळले. अनेक निष्पांचे जीव दरडीखाली दुर्दैवाने चिरडून गेले. शेकडो कुटुंबिय उद्ध्वस्त झाले. या संकटाच्या काळात भाजपा आता मदतीसाठी पुढे सरसावला असून, भाजपचे नेते सध्या कोकणात आहेत. पुराच्या संकटात सापडलेल्या हजरो कुटुंबियांना धीर देत त्यांच्यापर्यंत मदतीचा ओघ सुरु केला आहे. धान्य, जीवनावश्यक वस्तू, ब्लॅकेंट, खाऊ, घर बांधणीसाठी पत्रे, पिण्याचे पाणी, पाण्याचे टॅंकर आदी स्वरुपात प्रत्यक्ष मदत पूरग्रस्तांच्या कुटुंबियापर्यंत पोहचण्याची व्यवस्था केली आहे. हा मदतीचा ओघे अविरत सुरु आहे. भाजपाच्या माध्यामातून जिल्हा, तालुका, गाव पातळीवर मदतीचे योग्य पध्दतीने नियोजन करीत प्रत्येकाला या संकाटातून उभारण्यासाठी मदतीचे जाळे विणले आहे.

भाजपाच्या सर्व आमदारांनी एक महिन्याचे मानधन दिले!

अस्मानी संकटाशी दोन हात करत असलेल्या सर्व पूरग्रस्तांना या संकटकाळात भाजपा खंबीर साथ देत आहे. त्यांच्या साहाय्यासाठी महाराष्ट्रातील भाजपाच्या सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीसाठी देण्याचा निर्णय एकमुखाने घेतला आहे. निसर्ग… तौक्ते… महापूर… कोकणावर ओढवणाऱ्या अस्मानी संकटांची मालिका संपतच नाही. सरकार कोकणवासीयांसाठी नुकसानभरपाईचे पॅकेजेस जाहीर करते, पण ही तुटपुंजी मदत देखील गरजूंपर्यंत पोहोचतच नाही. गेल्या दीड वर्षांच्या काळात कोकणावर ओढवलेली ही तिसरी आपत्ती ! एखादी आपत्ती आली की प्रशासनाला तात्पुरती जाग येते, आश्वासनांचा पूर येतो. कोकणवासीय यामुळे खचून गेले आहेत. पण यास्थितीत सरकारी मदत, शासकीय पॅकेज याची वाट न पाहता भाजपाच्या तळागळातील कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करीत मदत साहित्य प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबियापर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली.

(हेही वाचा : भाजपच्या भीतीने महापालिकेत विरोधी पक्षाची धार बोथट!)

पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात!

केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे आमदार आशिष शेलार, आमदार गिरिष महाजन, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार संजय केळकर आदी अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी पूरग्रस्त ठिकाणी रातोरात पोहोचली. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. तेथील  जनतेच्या व्यथा समजून घेतल्या. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वोतोपरी त्यांच्या सोबत राहण्याचा शब्द भाजपाने दिला. केंद्र सरकार तसेच पंतप्रधान निवास योजनेच्या माध्यमातून पूरांमध्ये विस्थापित झालेल्या शेकडो कुटुंबियांचे घरांच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याचे आश्वासनही दिले आहे. भाजपाने सेवा हेच कार्य हाच ध्यास घेत पूरग्रस्तांना मदत करीत आहे. केंद्रीय मंत्र्यापासून भाजपाचे आमदार, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी राज्यामध्ये पूरग्रस्त भागांमध्ये ठिकठिकाणी मदतीचा ओघ सातत्याने सुरु ठेवत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here